मुंबई - बैलगाडी शर्यतींच्या आयोजनावर हायकोर्टाची बंदी कायम असून, बैल पळण्यासाठी बनलेला नाही, शर्यतीसाठी त्याला वापरणं हा अन्यायच आहे असे हायकोर्टने म्हटले आहे. बैल घोड्यासारखा धावू शकत नाही. बैल परफॉर्मिंग अॅनिल नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
बैलगाडी शर्यत बद्दल थोडक्यात माहिती - - बैलगाडी शर्यत हा खेळ ग्रामीण भागात रुजला आहे. हा खेळ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे होतो. सांगली साताऱ्यात चाकोरीतून गाड्या पळवल्या जातात. एका वेळी चार किंवा पाच गाड्या एकाच वेळी पळतात. या शर्यतीत गट, सेमी फायनल आणि फायनल अशा गाड्या पळतात. - खेड भागात बैलगाडी शर्यतीसाठी घाट बांधले आहेत. घाटातून एकच गाडी पळते. इथे सेकंदावर नंबर दिले जातात. खेडच्या शर्यतीत, सगळ्यात पुढे घोडे, त्यामागे एक गाडी आणि शेवटी शर्यतीची गाडी असते. -विदर्भात बैलगाडी शर्यतीला शंकरपट म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील काही गावात गाडीला घोडा आणि बैल जुंपून शर्यती होतात. रायगड जिल्ह्यात तर वाळूच्या रेतीत गाड्या पळवण्याची प्रथा आहे.