शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

खुनाचा फैसला ३० वर्षांनंतरही अनिर्णित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 5:52 AM

सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचूनही, हा खून नेमका कोणी केला? याचा फैसला देशाची न्यायव्यवस्था ३० वर्षांनंतरही करू शकलेली नाही.

अजित गोगटे,मुंबई- घर क्र. ९८, गुरुवार पेठ, पुणे येथे राहाणाऱ्या रघुनाथ नावाच्या व्यक्तीच्या खुनाचा खटला पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचूनही, हा खून नेमका कोणी केला? याचा फैसला देशाची न्यायव्यवस्था ३० वर्षांनंतरही करू शकलेली नाही.या खुनाबद्दल गणेश श्यामराव आणि अविनाश श्यामराव या रघुनाथच्या शेजारी राहाणाऱ्या दोन अंदेकर बंधुंना दोषी ठरवून, त्यांना जन्मठेप ठोठावण्यावरून सर्वोच्च न्यायालयात न्या. प्रफुल्ल चंद्र पंत आणि न्या. रोहिंग्टन फली नरिमन या दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद झाल्याने, आता हे प्रकरण सुनावणीसाठी तिसऱ्या न्यायाधीशांकडे जाणार आहे. खून झाला, तेव्हा वयाने विशीच्या आसपास असलेल्या या दोन्ही भावांनी आता पन्नाशी पार केली आहे व इतकी वर्षे जामिनावर असलेल्या या दोघांच्या डोक्यावर आणखी काही काळ अनिश्चिततेती टांगती तलवार कायम राहाणार आहे.सार्वजनिक शौचालय आणि नळावरून रघुनाथ आणि अंदेकर या दोन शेजाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये बराच काळ कलगीतुरा सुरू होता. त्यातूनच घरासमोर सुरू झालेल्या भांडणातून गाडीखाना चौकातील राजेश बोर्डिंग हाउसपर्यंत पाठलाग करून आणि तलवार, चाकू, गुप्ती व खुकरी अशा तीक्ष्ण हत्यारांनी नऊ वार करून, १४ आॅक्टोबर १९८६ रोजी भर दुपारी रघुनाथचा खून करण्यात आला होता.रघुनाथची पत्नी शकुंतला हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १५ आरोपींना अटक करून, त्यांच्यावर खुनाचा कटला दाखल केला. त्यात शकुंतला व रघुनाथची त्या वेळी २३ वर्षांची असलेली मुलगी रोहिणी या दोघींनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती. मारेकऱ्यांचा या दोघींनी पाठलाग केला होता. ज्याच्या रिक्षातून रोहिणीने जखमी रघुनाथला ससून इस्पितळात नेले, त्या सुरेश चव्हाण याची साक्षही महत्त्वाची होती.पुण्याच्या सत्र न्यायालयाने ११ मे १९८९ रोजी या खटल्याचा निकाल दिला आणि सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. याविरुद्ध सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या अपिलाचा निकाल न्या. डी. जी. देशपांडे व न्या. एस. आर. साठे यांच्या खंडपीठाने तब्बल १८ वर्षांनी म्हणजे, २० फेब्रुवारी २००७ रोजी दिला. शामराव अंदेकर, गणेश आणि अविनाश ही त्यांची दोन मुले आणि विजय रामचंद्र यादव या चार आरोपींच्या बाबतीत उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल फिरविला व त्यांना संगनमताने खून केल्याबद्दल (भादंवि कलम ३०२ व ३४) त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.या चौघांनी याविरुद्ध केलेल्या अपिलाचा निकाल गेल्या गुरुवारी लागेपर्यंत श्यामराव व विजय यांचे निधन झाले होते. न्या. पंत यांनी उच्च न्यायालयाचा निकाल योग्य ठरवत, गणेश व अविनाश यांची जन्मठेप कायम केली, पण न्या. नरिमन यांना हा निकाल मान्य झाला नाही. त्यामुळे आता दोघांच्या अपिलाची तिसऱ्या न्यायाधीशापुढे सुनावणी होईल व त्यानुसार निर्णय होईल. दोन्ही अंदेकर बंधुंसाठी सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील उमेश आर. लळित यांनी काम पाहिले.>मतभेदाचे कळीचे मुद्देरघुनाथ यास आपण इस्पितळात नेले, असे रोहिणीने साक्षीत सांगितले. मग त्याला रेखा कोळेकर नावाच्या महिलेने दाखल केल्याची नोंद इस्पितळात कशी?रघुनाथला भोसकून मारेकरी पळून गेल्यानंतर, रोहिणी तेथे आली व शकुंतलाही त्या वेळी नव्हती, अशी साक्ष रिक्षावाल्याने दिली, तरी रोहिणी व शकुंतला यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मानून त्यांच्या साक्षींवर विश्वास कसा ठेवावा?मारेकऱ्यांनी रघुनाथवर मांडीच्या सांध्यावर (ग्रॉईन) वार करताना आपण प्रत्यक्ष पाहिल्याचे रोहिणीने साक्षीत सांगितले, पण उत्तरीय तपासणीत त्या जागेवर कोणतीही जखम आढळून आली नाही.घरासमोरच हल्ला होऊनही घरात न पळता रघुनाथ बाहेर एवढ्या दूरवर कशासाठी पळत गेला?