शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

नोटाबंदीचा निर्णय फसलाच

By admin | Published: January 09, 2017 5:13 AM

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा जो निर्णय घेतला, तो आत्मविश्वास ३१ डिसेंबर रोजी झालेल्या भाषणात दिसला नाही. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसला आहे

मुंबई : ८ नोव्हेंबर रोजी ज्या आत्मविश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा जो निर्णय घेतला, तो आत्मविश्वास ३१ डिसेंबर रोजी झालेल्या भाषणात दिसला नाही. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसला आहे आणि हे मी म्हणत नाही, तर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे. अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे.जागतिक मराठी अकादमी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ (ट्रस्ट) तर्फे दादर येथील शिवाजी मंदिर येथे दोनदिवसीय मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या संमेलनाच्या सांगता सोहळ््यात राज ठाकरे यांची रविवारी मुलाखत घेण्यात आली, या वेळी ते बोलत होते.राज्यात असलेल्या किल्ल्यांचे संवर्धन करण्यास सरकार असमर्थ ठरत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अरबी समुद्रात उभारण्याचा घाट म्हणजे, खिशात पैसे नसताना घेतलेला निर्णय आहे. त्यापेक्षा शिवाजी महाराजांची महती जपण्यासाठी त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा, असा सल्लाही त्यांनी दिला.शिवस्मारकाविषयी राज म्हणाले, अमेरिकेतील स्टॅच्यू आॅफ लिबर्टीच्या शिल्पाला समोर ठेवून अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे, परंतु समुद्रात हे शिल्प उभारण्यापूर्वी शिल्प म्हणजे काय? याची माहिती आहे का? उभारलेल्या पुतळ््यांवरून गल्लोगल्ली होणारे राजकारण कमी आहे का? त्यात आणखी नवा पुतळा समुद्रात उभारायचा कशाला? शिवाजी महाराजांबद्दल इतकाच आदर असेल, तर त्यांनी उभारलेल्या किल्ल्यांचे जतन करा. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज कोण? हे लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना इतिहासाच्या माध्यमातून शिकवा, तरच तो अधिक बिंबेल आणि असे पुतळे उभारण्याची गरज भासणार नाही. पंतप्रधानांच्या योेजनेत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा समावेश आहे, ती कशाला? यामागे स्वतंत्र मुंबई करण्याचे मोदी यांचे षडयंत्र आहे. कारण मुंबई-दिल्ली अशी विमान फेऱ्यांना अधिक मागणी असताना, मुंबई-अहमदाबाद हा मार्ग कशाला? विशेष म्हणजे, या प्रवासात राज्यासाठी केवळ चारच थांबे आहेत. त्यामुळे हे षडयंत्र ओळखा, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)व्यंगचित्राचा उलगडला प्रवासराज यांनी या वेळी त्यांच्या व्यंगचित्राचा प्रवास उलगडला. पाश्चिमात्य कलांविषयी ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशात कलेची कदर केली जाते. ती आपल्या देशात हवी तशी केली जात नाही. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सहलीसाठी आलेली किती मुले तेथील चित्रे पाहतात? हा प्रश्न आहे. कारण दिलेल्या वेळेत मुलांना जहांगीर आर्ट गॅलरी दाखवली जाते. तेथे मांडलेली चित्रे नाहीत. त्यामुळे कलेची बीजे मुलांमध्ये रुजणार कशी?उदाहरणादाखल ते म्हणाले की, २६ जुलै २००५ च्या मुंबईच्या पावसात चित्रकार माधवराव सातवळेकर यांनी काढलेल्या चित्रांचा अक्षरश: चिखल झाला. त्यांच्या या अमूल्य चित्रांसाठी सरकार पुढे सरसावले नाही, ही खंत आहे. त्यामुळेच कलेची कदर भारतात इतर देशांच्या तुलनेत होत नाही.१ - कला टिकविण्यासाठी इतिहासाचे जतन करणे आवश्यक आहे. ते केले जात नाही. त्याला कारणीभूत शिक्षणपद्धती आहे. आपल्याकडे शिक्षणपद्धतीची तर बोंबच आहे. येणारा प्रत्येक नवा शिक्षणमंत्री आपल्याप्रमाणे शिक्षणाविषयीचे धोरण ठरवतो, परंतु शिक्षणपद्धतीत सुधारणा झालेली दिसत नाही. उलट मुलांसमोर काय करावे, हा प्रश्न कायमच असतो. २ - शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असून, अभ्यासक्रम हा एकत्रित विचार करून तयार केला पाहिजे. म्हणजे आता होणारा गोंधळ टाळता येईल. दप्तरांच्या ओझ्यावर टीका करताना ते म्हणाले की, दप्तरांचे ओझे म्हणजे काय? हे नेमके कोणाला कळले नाही. कारण काटे घेऊन केवळ दप्तरांचे वजन मोजण्यापेक्षा पुस्तके कशी कमी करता येतील, याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.