मुंबई - राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीबाबत गुरुवारी निर्णय होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या होणार असलेल्या बैठकीमध्ये आहे. एसटी महामंडळाने २ ते ३ कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी स्वयंचलित भाडे सुधारणा सूत्राअंतर्गत भाडेवाढीची मागणी केली होती. गेल्यावर्षी हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार १४ ते १५ टक्के भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार टप्पा वाहतूक सेवांच्या भाड्यांमध्ये आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार प्रतिटप्पा दरवाढ व ठोक भाडे पद्धतीने प्रवासभाडे आकारणीसाठी परवानगी मिळण्यावर निर्णय होणार आहे.
एसटीच्या भाडेवाढीवर आज निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 08:18 IST