लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्याचे कृषी राज्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी घेतलेल्या भूमिकेवर जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांना मंगळवारी (दि. ४)या समितीसमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, खोत हे हजर न राहिल्याने त्यांना २१ जुलै रोजी समितीपुढे म्हणणे मांडण्याचा अंतिम इशारा देण्यात आला आहे.या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवी तुपकर आणि सतीश काकडे यांचा समावेश आहे. २१ जुलै रोजी पुण्यातच शासकीय विश्रामगृह येथे समितीची बैठक घेतली जाणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.
सदाभाऊंबाबत २१ जुलैला निर्णय
By admin | Published: July 05, 2017 4:25 AM