मुंबई : खासगी बस सेवांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि त्यामुळे एसटीचे घटलेले प्रवासी पाहता महामंडळाने ५०० हायटेक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वाधिक एसी बसबरोबरच नॉन एसी स्लीपर बसचाही समावेश आहे.१0 आॅगस्ट रोजी एसटी महामंडळाच्या बोर्डाची बैठक पार पडली. बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये एसी बसची सर्वांत जास्त संख्या असेल. तसेच नॉन एसी स्लीपर तसेच काही प्रमाणात निमआराम बसचा समावेश आहे. याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि त्यानंतर बसचे मार्ग ठरवण्यासाठी एक सल्लागारही नेमण्यात येणार आहे, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले.
भाडेतत्वावर बस घेण्याचा एसटीचा निर्णय
By admin | Published: August 14, 2015 1:41 AM