शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

CoronaVirus : शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर - सीताराम कुंटे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 9:35 AM

"ज्या जिल्ह्यात किंवा शहरात रुग्ण संख्या कमी झाली आहे, किंवा पूर्णपणे नाहीशी झाली आहे, अशा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन करता येईल."

अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर गेला आहे. याविषयीचे विस्तृत आदेश लवकरच काढले जातील, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (Decision to start school postponed says Sitaram Kunte)लहान मुलांसाठीचा टास्क फोर्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला आहे. त्याशिवाय डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक टास्क फोर्स कार्यरत आहे. या दोघांसह टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदींसह ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत चाललेली आहे त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची एक बैठक मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. रात्री उशिरा ही बैठक संपली. त्यानंतर लोकमतशी बोलताना कुंटे म्हणाले, बंगळुरूमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळत आहेत. तसेच इंडोनेशियामध्येही लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती पेडियाट्रिक टास्क फोर्सने बैठकीत दिली आहे. त्यांनी काही कागदपत्रे आणि फॉर्म देखील तयार करून बैठकीत दाखवले. लहान मुलांसाठी या आजारावर उपयुक्त औषधे नाहीत. शिवाय लहान मुलांना आपण लसीकरण ही सुरू केलेले नाही. त्यामुळे एकदम शाळा उघडल्या तर ते अडचणीचे होईल, अशी प्रतिक्रिया सर्व तज्ञ डॉक्टरांनी दिल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले. 

ज्या जिल्ह्यात किंवा शहरात रुग्ण संख्या कमी झाली आहे, किंवा पूर्णपणे नाहीशी झाली आहे, अशा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन करता येईल. नंदुरबार, धुळे, लातूर, अशा काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण कमी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करता येतील. पण हे जिल्हे किंवा अशी शहरे अपवाद असतील. ज्या ठिकाणी रुग्ण संख्या अद्यापही कमी होत नाही, किंवा नियंत्रणात येत नाही, असे आकडेवारीवरून समोर येत असेल त्या जिल्ह्यांमध्ये सरसकट शाळा सुरू करता येणार नाहीत, असे सांगून मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, १७ तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी जे आदेश काढले होते, त्यात कशा पद्धतीने सुधारणा करता येतील यावरही तातडीने निर्णय घेतला जाईल. मात्र लगेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेता येणार नाही.

 ज्या जिल्ह्यात सलग तीन आठवडे एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही, असे शहर किंवा जिल्हे शाळा सुरू करण्यासाठी पात्र धरावेत, अशी ही चर्चा आजच्या बैठकीत झाली. पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या प्रमुखांनी जी उदाहरणे दिली आहेत, त्यांचाही अभ्यास करून तातडीने त्याची माहिती गोळा करण्याचे आदेश आपण दिल्याचे कुंटे यांनी सांगितले. शहर आणि जिल्ह्याची परिस्थिती पाहूनच शाळा सुरू केल्या जातील. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली जाईल. शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि अन्य अधिकारीही आजच्या बैठकीला उपस्थित होते असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसStudentविद्यार्थीSchoolशाळा