मुंबई : इचलकरंजी नगरपालिकेचे इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालय (आयजीएम) हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला ४ जानेवारी रोजी मिळाला असून, यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली.इचकरंजी नगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णांसाठी अत्यावश्यक व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने, या रुग्णालयाचा कारभार नगरपालिकेच्या हातातून काढून राज्य सरकारकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका इचलकरंजीच्या रहिवाशांनी अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयाला केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.रुग्णांचे हाल होत असल्याने, न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या या मागणीवर सरकारला व नगरपालिकेला विचार करण्यास सांगितले होते. (प्रतिनिधी)
आयजीएम हस्तांतरणाबाबत लवकरच निर्णय - सरकार
By admin | Published: January 31, 2016 2:11 AM