रत्नागिरी: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. संचयनी ग्रुपकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबाबत किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणेंनी आज रत्नागिरी पोलीस अधिकाऱ्यांसोब चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं.
यावेळी सोमय्या म्हणाले की, अनिल देशमुख प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं, साक्षीदार फोडण्याचं काम करताहेत. काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या वकिलाने थेट सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाच लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा व्यक्तिंना बाहेर ठेवणं धोकादायक आहे. देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित कराव आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
अनिल परबांवर निशणायावेळी सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यांवरही टीका केली. अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. पण, सरकारने केवळ एकच रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा असं ते म्हणाले.
यादी अजून वाढणारकाल-परवाच सोमय्या यांनी काही नेत्यांची एक यादी जाहीर केली. त्या भ्रष्टाचाराच्या यादीतल 12 वा खेळाडू राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत, असं ते म्हणाले होते. दरम्यान, ही यादी इथेच संपली का ? असा प्रश्न पत्रकारांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत विचारला. त्यावर बोलताना सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री स्वत: घोटाळेबाज आहेत. त्यांनी 19 बंगले बांधले, बायकोच्या नावावर बंगले बांधतात. हे घोटाळे असेच चालू राहिले तर यादी वाढणारच, असा घणाघात त्यांनी केला.