शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

दहीहंडीला क्रीडा प्रकार घोषित करा

By admin | Published: July 08, 2017 5:50 AM

दहीहंडीची उंची व बाल गोविंदांचा सहभाग यावर न्यायालयाने बंधने आणल्याने गेली दोन वर्षे कुरकुर करीत का होईना या बंधनांचे पालन करणाऱ्या

अजित मांडके/ लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दहीहंडीची उंची व बाल गोविंदांचा सहभाग यावर न्यायालयाने बंधने आणल्याने गेली दोन वर्षे कुरकुर करीत का होईना या बंधनांचे पालन करणाऱ्या ठाण्यातील दहीहंडी आयोजक व गोविंदा पथकांचे लक्ष येत्या १० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंधने कायम ठेवली तर राज्य सरकारने दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करणारा अध्यादेश काढून दिलासा द्यावा याकरिता शिवसेना व भाजपा नेत्यांचा दबाव वाढत आहे. मनसेने मात्र गतवर्षीनुसार यंदाही नऊ थर लावण्याचा चंग बांधला असून ११ लाखांच्या बक्षिसाचे आमिष दाखवले आहे.काही वर्षापासून ठाण्यात विविध राजकीय नेत्यांकडून भपकेबाज दहीहंडी साजरी करण्यास सुरुवात झाली. एकेकाळी इमारतींच्या आवारात पांरपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा हा उत्सव रस्त्यावर आणून थरांची उंची, सेलिब्रिटी यांची स्पर्धा लावली गेली. लक्षावधी रुपयांची बक्षिसे जाहीर केली गेली. दहीहंडीचा पारंपरिक बाज संपुष्टात आणून तिला इव्हेंटचे स्वरुप देण्यात आले व सातासमुद्रापार नेण्याचा प्रयत्नही झाला. उंचीचे थर नऊपर्यंत गेल्याने दहीहंडी फोडताना अपघात होऊन बाल गोंविदा मृत किंवा जायबंदी होऊ लागले. त्यामुळे काहींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले व बंधने लागू झाली.तीन वर्षापासून न्यायालयाने घातलेल्या बंधनां विरोधात ठाण्यातील राजकीय नेते अवाज उठवत आहेत आणि न्यायालयीन लढाई लढत आहेत. दहीहंडी उत्सवाला क्रीडा प्रकार घोषित करावे, अशी मागणीही केली गेली. मात्र गेली दोन वर्षे ठाण्यातील काही नेत्यांच्या दहीहंड्यांमध्ये न्यायालयीन बंधने पाळली गेली. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे त्यांचे लक्ष आहे. राज्य शासनामार्फत अध्यादेश काढून दिलासा द्यावा, असे सेना नेत्यांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास यंदा मोठ्या धूमधडाक्यातच हा उत्सव साजरा केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान ठाणे शहर मनसेने मागील वर्षी प्रमाणेच यंदा देखील नऊ थरांची हंडी लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मागील वर्षी प्रमाणे यंदा आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन होणार नाही. कोणत्याही प्रकारचा धांडगधिंगा नसेल, असा विश्वास शहर मनसेने व्यक्त केला आहे. यंदा देखील नऊ थरांची हंडी उभारण्यात येणार आहे. परंतु आवाजाचा मर्यादाभंग करुन धांगडधिंगा असणार नाही. या हंडीसाठी ११ लाखांचे बक्षीसही लावण्यात येणार आहे.-अविनाश जाधव, मनसे शहर अध्यक्षन्यायालयाने बंधने कायम ठेवली तर आता राज्य सरकार या उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबत अध्यादेश काढणार आहे. त्यामुळे दहीहांडी उत्सव धुमधडाक्यात साजरा करु.- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेनापांरपारिक पद्धतीने यापूर्वी उत्सव साजरा होत होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. परंतु दहीहांडी उत्सव साजरा करणारच - आ. रवींद्र फाटक, शिवसेनादहीहंडी उत्सवाबाबत आमचे दोघे न्यायालयीन लढा लढत आहेत. त्यामुळे इतरांनी आम्हाला सांगू नये. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल.- आ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी