मुंबई : राज्यात मागील काही दिवसांत रुग्ण व मृत्यू संख्येत सातत्याने घट होते आहे. तसेच, रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात शनिवारी ६ हजार ६१ रुग्ण आणि १२८ मृत्यूंची नोंद झाली आहे.दुसरीकडे ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ६१ लाख ३९ हजार ४९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. सध्या राज्यात ७१ हजार ५० रुग्ण उपचाराधीन आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७२ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९३ लाख ७२ हजार २१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२.८६ टक्के नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३१ हजार ५३९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून २ हजार ७६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्याचा मृत्युदर २.१ टक्के आहे..
CoronaVirus News: राज्यात सक्रिय रुग्णांत घट; दिवसभरात ६ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 7:05 AM