शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

तूर, चना डाळीच्या किमतीत घट

By admin | Published: May 02, 2016 12:14 AM

तूर डाळीच्या टंचाईनंतर वाढलेल्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या छापासत्रामुळे तूर आणि चना डाळींच्या किमतीत आठ दिवसात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घट झाली

नागपूर : तूर डाळीच्या टंचाईनंतर वाढलेल्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या छापासत्रामुळे तूर आणि चना डाळींच्या किमतीत आठ दिवसात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घट झाली आहे. घाऊक बाजारात तूर डाळ १२० ते १३५ आणि चना डाळ ६८ ते ७० रुपये किलोपर्यंत खाली आली आहे.छापासत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये साठा करण्याची मानसिकता नाही. गेल्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात एका व्यापाऱ्याकडून धान्य वितरण विभागाने ४६१ क्विंटल तूर डाळ जप्त केली होती.गेल्या दोन वर्षांत तुरीचे उत्पादन फारच कमी झाहे. डाळमील चालकांना ८५०० ते ९००० रुपये क्ंिवटल या दराने तूर खरेदी करावी लागत आहे. सर्व प्रक्रियेनंतर डाळ तयार झाल्यास बाजारात खरेदीसाठी ग्राहक नाहीत. शिवाय डाळ महाग असल्यामुळे कुणीही व्यापारी साठवणूक करीत नाहीत. दुसरीकडे गरीब आणि सामान्य ग्राहकांनी तूर डाळीला पर्याय म्हणून वाटाणा डाळीचा पर्याय शोधला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी तूर डाळ खरेदीवर अघोषित बंदी टाकल्याचे बाजारात दिसत आहे. शासनाने तपासणी व चौकशी करावी, पण साठवणुकीची मर्यादा घालून द्यावी, असे मत धान्य बाजाराचे अभ्यासक रमेश उमाठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तूर डाळीच्या किमतीत लाखोळी डाळ स्वस्त आहे. शिवाय प्रथिने जास्त प्रमाणात असल्यामुळे तिची विक्री वाढली आहे. तांदळाच्या किमतीत चढउतारउपलब्धतेनंतरही बाजारात मागणीअभावी तांदळाच्या किमतीत घट झाली आहे. लग्नसराईची खरेदी संपली आहे. ठोक बाजारात श्रीराम तांदळाच्या किमतीत क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची घट होऊन किंमत ४६०० ते ४६५० रुपयांवर स्थिरावली आहे. चिन्नोर तांदळात २०० रुपयांची वाढ झाली. भाव ४७०० ते ५००० रुपयांवर गेले. याउलट एचएमटी ३२०० ते ३४००, बीपीटी २८५० ते ३१००, सुवर्णा तांदूळ २२०० ते २४०० रुपयांवर स्थिर आहे. (प्रतिनिधी)गहू वधारला : मध्यतंरी पावसामुळे काही प्रमाणात गहू खराब झाला. त्यामुळे उत्तम दर्जाच्या गव्हाला मागणी वाढली. परिणामी ठोक बाजारात क्विंटलमागे दरात ५० ते १०० रुपयांची वाढ झाली. एमपी बोट सरबती २४०० ते ३५५० रुपये, लोकवन मध्यम १९०० ते २२५० रुपये, लोकवन उत्तम २२५० ते २४००, तुकडी २२०० ते २४५० रुपये भाव आहेत. ट्रकच्या वाढीव भाड्याचा गव्हाची किंमत वाढण्यास हातभार लागल्याची माहिती उमाठे यांनी दिली.