पुणे : सोमवार सकाळपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, राज्यात उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे होते. मात्र, गार वाऱ्यांच्या प्रवाहामुळे सोमवारी दिवसाचे राज्याच्या तापमानात घट दिसून आली.दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, तेलंगणापर्यंत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि दक्षिण तामिळनाडूपर्यंत विस्तारलेली द्रोणीय स्थितीमुळे विदर्भात ढग जमा होत आहेत. त्यामुळे विदर्भात गोंदिया येथे १० मिमी पावसाची नोंद झाली, तर अन्य ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या बहुतांश शहरातील कमाल तापमानात १ ते ३ अंशांनी घट झाली.
राज्यातील तापमानात घट
By admin | Published: March 15, 2016 1:22 AM