शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

राज्यात गोवंशाचे घटते प्रमाण चिंताजनक

By admin | Published: September 12, 2015 2:01 AM

शेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे

- नितीन गव्हाळे,  अकोलाशेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे प्रमाण घटू लागले. १९व्या पशुगणनेतील आकडेवारीनुसार दरवर्षी राज्यात ३0 हजारांवर गोवंश घटत आहे.गोवंशाचा विचार केला असता, पूर्वी महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक होता आणि दर १00 हेक्टर पिकांखालील जमिनीमागे ११६ जनावरे एवढी घनता होती. २00७च्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात दर लाख लोकसंख्येमागे ३८ हजार इतके गोवंश होते. हेच प्रमाण २00३ मध्ये ३९ हजार होते. १९९७मध्ये दर लाख लोकसंख्येमागील गोवंशाचे प्रमाण ५0 हजार होते. सातत्याने गोवंशाचे प्रमाण घटत असल्याचे यावरून स्पष्ट होते. गोवंश घटण्यामागे मांसासाठी सुरू असलेली कत्तल, ट्रॅक्टरचा वाढलेला अतिवापर, चाऱ्याची टंचाई ही प्रमुख कारणे आहेत. पशुगणनेनुसार २00७ मध्ये राज्यात १ कोटी ६१ लाख ८३ हजार ५२७ (गाय व बैल) होते. २0१२ मध्ये त्यात ६ लाख ९९ हजार ३२0 गोवंशाची घट होऊन, ते १ कोटी ५४ लाख ८४ हजार २0७ पर्यंत आले.पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम रेतन कार्यक्रमाच्या माध्यमातून गोधन वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. असे असतानाही गोधन घटत आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून गोपालनाकडे वळले पाहिजे तरच शेती, कुटुंबाचा विकास साधला जाईल आणि गोधनवाढीसही हातभार लागेल. -डॉ. अशोक हजारे, विभागीय सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अमरावती