शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

छोटा राजनवरील २० गुन्ह्यांचा सखोल तपास

By admin | Published: November 05, 2015 3:03 AM

कुख्यात गँगस्टर छोटा राजन याच्याविरुद्ध खून, खंडणी व अपहरणाचे ७५ गुन्हे दाखल असले, तरी महत्त्वाच्या २० गुन्ह्यांबाबत सखोल तपास केला जाणार आहे. या प्रकरणात राजनचा सहभाग

- जमीर काझी,  मुंबईकुख्यात गँगस्टर छोटा राजन याच्याविरुद्ध खून, खंडणी व अपहरणाचे ७५ गुन्हे दाखल असले, तरी महत्त्वाच्या २० गुन्ह्यांबाबत सखोल तपास केला जाणार आहे. या प्रकरणात राजनचा सहभाग असल्याचे थेट पुरावे असल्याने त्याची चौकशी करून गुन्हे सिद्ध करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. न्यायालयात त्याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध होऊन शंभर टक्के शिक्षा होईल, अशा गुन्ह्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये १९८२ मधील टिळकनगरातील खुनापासून ते ११ जून २०११ रोजी झालेल्या पत्रकार जे.डे. यांच्या खून खटल्याच्या समावेश असल्याचे क्राइम ब्रँचमधील या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. छोटा राजनला भारतात आणल्यानंतर पहिल्यांदा सीबीआय त्याचा ताब्यात घेईल. त्यानंतर दिल्ली पोलिसांकडूनही बनावट पासपोर्टप्रकरणी ताबा मिळण्यासाठी दावा केला जाईल. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तो दिवाळीनंतर मुंबईत आणला जाईल, या दृष्टीने क्राइम ब्रँचमधील अधिकाऱ्यांचे पथक गुन्ह्यांचा आढावा घेत आहे. सबळ पुरावे असलेल्या गुन्ह्यांची यादी बनविण्यात आली आहे. त्यात इंटरपोलकडे देण्यात आलेल्या १४ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसह जवळपास अन्य सहा गुन्ह्यांचा समावेश आहे.अंडासेल मुंबई पोलिसांच्या ताब्यात छोटा राजनला डी गँगकडून धोका असल्याने त्याला आॅर्थर रोड कारागृहातील १२-ब ब्लॉकमधील तळमजल्यावरील अंडासेलमध्ये ठेवले जाईल, हे निश्चित झाले आहे. त्या परिसराचा तात्पुरता ताबा सध्या मुंबई पोलिसांनी घेतला आहे. ‘२६/११’ मधील अतिरेकी अजमल कसाबला याच अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते. आता या तळमजल्याचा कारागृह क्षेत्राचा दर्जा रद्द केल्याने मुंबई पोलिसांना चौकशीसाठी तेथे सहजपणे जाता येईल. राजनविरुद्धचा तपास पूर्ण होईपर्यंत दरवर्षी एक रुपया दराने त्याबाबत भाडे आकारले जाणार असल्याचे गृह विभागाकडून स्पष्ट केले आहे. पोलिसांना वेळ घालवायचा नाही : अपहरण व खंडणी आणि हाफ मर्डरचे छोटा राजनवर अनेक गुन्हे दाखल असले, तरी त्यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये फिर्यादीने छोटा राजनच्या नावाने फोन आला होता, असे सांगितले आहे. राजन गँगचे असल्याचे सांगून आरोपींनी गुन्हा केल्याचे नमूद आहे. मात्र, त्याच्या सहभागाबाबत कोणताच सबळ पुरावा पोलिसांच्या हाती नाही, त्यामुळे न्यायालयात त्याच्यावर दोष सिद्ध होणे अशक्य असल्याने, त्याबाबत तपास करून वेळ दवडला जाणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.