अहमदनगर : बाबा, दादा आणि आबा यांच्यामुळे राज्याची कृषी, रोजगार, औद्योगिक क्षेत्रत मोठी पीछेहाट झाली आहे. दोन्ही काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राज्याची भाग्यरेषा बदलणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केला.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी व अकोले येथील भाजपाच्या प्रचारसभांमध्ये ते बोलत होते. गडकरी म्हणाले, शेतीमालाला भाव मिळत नाही. खते महाग झाली आहेत.मूठभर नेत्यांची गरिबी हटली मात्र गरिबाची हटली का? हे विदारक चित्र आहे. मोदींमुळे देशात काँग्रेसची दुकानदारी बंद झाली आहे. देशाचे नाव जगात मोठे होऊ लागले आहे. येत्या तीन महिन्यांत देशात शेतक:यांच्या इथेनॉलवर बस धावणार आहे. इंधन, गॅस, पेट्रोल निर्मितीतून शेतक:यांना ऊर्जा मिळण्यासाठी धोरण राबविले जाणार असल्याचे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)