बुलडाणा : आतापर्यंत जिल्हा परिषदेत एकदाही सत्ता न मिळालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी चांगलीच मुसंडी मारली आहे. गतवेळी ६०पैकी केवळ चार जागा मिळालेल्या भाजपाने यावेळी २४ जागांवर विजय मिळविला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ग्रामीण भागात प्रचंड रोष असून, मतदार भाजपाला नाकारतील हा अंदाज फोल ठरला आहे. भाजपाला जिल्ह्याच्या घाटाखालील भागात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर व आ. संजय कुटे यांनी त्यांच्या तालुक्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकत भाजपाला यश मिळवून दिले. भाजपाने खामगाव तालुक्यातील सातपैकी सात, तर जळगाव जामोद तालुक्यात चार जि. प. सर्कलमध्ये विजय मिळविला. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून, त्यांना सत्ता स्थापनेकरिता सात जागा हव्या आहेत. शिवसेनेने १० जागांवर विजय मिळविला आहे. भाजपा सत्तास्थापनेसाठी शिवसेनेशी युती करते की आणखी काही वेगळी खेळी खेळली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)बुलडाणापक्षजागाभाजपा२४शिवसेना१०काँग्रेस१३राष्ट्रवादी0८इतर0५
काँग्रेसचा गड ढासळला
By admin | Published: February 24, 2017 4:34 AM