शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भ्रष्ट मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवू

By admin | Published: August 11, 2016 4:40 AM

एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून सरकारच्या भ्रष्ट कारभाराची सुरुवात आहे. अधिवेशनादरम्यान अनेक मंत्र्यांचे अनेक प्रकार उजेडात आले

सांगली : एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून सरकारच्या भ्रष्ट कारभाराची सुरुवात आहे. अधिवेशनादरम्यान अनेक मंत्र्यांचे अनेक प्रकार उजेडात आले. भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश करून भ्रष्ट मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवू, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, विद्यमान सरकारचा कारभार चांगला चाललेला नाही. एकामागोमाग एक गैरव्यवहाराची प्रकरणे उजेडात येत असल्याने जनतेलाही काय कळायचे ते कळले आहे. आम्ही विरोधक म्हणून अशा भ्रष्ट मंत्र्यांना सरकार जोपर्यंत घरी बसवित नाही, तोपर्यंत प्रकरणांचा पाठपुरावा करीत राहणार आहोत. अनेक चौकशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लावत आहेत, मात्र त्या पूर्ण कधी होणार, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. सरकारकडे चांगली लोकं नसल्याने गोंधळ निर्माण होऊन कारभार दिशाहीन बनला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना गेल्या महिन्याभरात घडल्या. कोपर्डी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, उस्मानाबाद, मिरज याठिकाणच्या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. गुन्हेगारांवर दहशत बसावी, अशा कोणत्याही गोष्टी सरकार करीत नाही. त्यामुळे अपप्रवृत्ती वाढत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या योग्यरितीने होत नसल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)मानधन वाढीचा निर्णय योग्यच!फ्रान्स, सिंगापूर, तसेच अन्य देशात अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींचे मानधन अधिक आहे. आपल्या देशात आमदार, खासदारांचे मानधन वाढविण्याचा निर्णय तेच घेत असतात. त्यामुळे लोकांना या गोष्टीची चीड येते. वास्तविक त्यांच्या खर्चाचा विचार केला, तर मानधन वाढीच्या निर्णयात अयोग्य काहीच नाही.