पाटेठाण : आकस्मिक स्वरूपात घडून आलेली घटना म्हणजे आपत्ती आणि पावसाचे जास्त प्रमाण, नद्यांच्या पाणीपातळीत झालेली अचानकपणे वाढ म्हणजे पूर होय. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीला महाकाय पुरामध्ये ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याने फार मोठी जीवितहानी झाली होती. म्हणूनच अशा अकस्मात घडून येत असलेल्या घटनांपासून संरक्षण करण्यासाठी वाळकी (ता. दौंड) येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचलित नवभारत विद्यालयातील नववीच्या वर्गातील विद्यार्थी बालवैज्ञानिक आदित्य विमलकांत भालेराव याने ‘अकस्मात तुटलेल्या पुलापासून संरक्षण’ यासाठी वैज्ञानिक प्रकल्प उपकरण तयार करून संशोधक वृत्ती जोपासली. आदिनाथने वाया गेलेल्या फर्निचरचे तुकडे, खिळे, पट्ट्या, दोरा, फेविकॉल वापरून हे उपकरण तयार केले. मागील वर्षी पावसाळ्यात महाड येथील पूल पुराच्या पाण्यात तुटल्याने झालेली दुर्घटना, मनुष्यहानी यावर भविष्यात अशी घटना घडली तर उपाययोजना म्हणून या प्रकल्पामध्ये प्रतिबंधात्मक उपाय सुचवलेले आहे. या यंत्राचा वापर करून जीर्ण व कमकुवत झालेल्या पुलांपासून मनुष्यहानी टाळता येऊ शकते, हे उपकरण यंत्राच्या साहाय्याने दाखवले असल्याचे त्याने सांगितले. कुरकुंभ येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात हा प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यासाठी मुख्याध्यापक एस. एस. टुले, डी. एस. भामरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. >एखाद्या पुलाचा काही भाग ढासळल्यास पुलाच्या दोन्ही बाजूंचे प्रवेश काही काळापुरते तात्पुरते बंद करता येऊ शकतात. अशा पद्धतीने हा प्रकल्प बनवताना विजार केली आहे. त्यामुळे ही व्यवस्था प्रकल्पात केली आहे.
‘अकस्मात तुटलेल्या पुलापासून संरक्षण’
By admin | Published: February 28, 2017 1:48 AM