मुंबई : काँग्रेसच्या वाटय़ातील 174 जागांवरील बहुतेक उमेदवार पक्षाच्या निवड समितीने निश्चित केले असून, तीन-चार अपवाद वगळता बहुतेक सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते.
राष्ट्रवादीशी चर्चा करण्यापूर्वी उमेदवार वेगवेगळ्या कसोटय़ा लावून ठरविण्यावर काँग्रेस नेत्यांनी भर दिला. बहुतेक मतदारसंघांसाठी एकेकाच उमेदवाराचे नाव काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवड मंडळाकडे सादर करण्याचा छाननी समितीचा प्रय} आहे. त्यानुसार जवळपास 15क् नावे निश्चित करण्यात आल्याचे सूत्रंनी सांगितले. केंद्रीय छाननी समितीचे अध्यक्ष मल्लिकाजरुन खरगे गेले दोन दिवस मुंबईत आहेत. आजही समितीची बैठक होऊन उमेदवार निवडीची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणो असे सगळे ज्येष्ठ नेते उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत व्यस्त आहेत. ज्यांची नावे समितीने निश्चित केली, त्यावर खरगे हे येत्या एक-दोन दिवसांत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची अंतिम मोहोर उमटवतील, असे सूत्रंनी सांगितले.
काही ठिकाणी पेच
एकाहून अधिक उमेदवार प्रबळ दावेदार असणा:या मतदारसंघांत छाननी समिती खल करीत आहे. एक नाव ठरू शकले नाही, तर पक्षश्रेष्ठींकडे दोन नावे देण्यात येतील, असे प्रदेश काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिका:याने सांगितले. असे साधारणत: 25 मतदारसंघ आहेत.