शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

Deglur Election Result, Dadra and Nagar Haveli Result 2021: दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, देगलूरमध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकरांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 10:15 AM

Deglur Election Result, Dadra and Nagar Haveli Result 2021: आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.

मुंबई : काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिडणुकीच्या निकालाची आज निकाल आहे. तसेच, फेब्रुवारी 2021 मध्ये अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे केंद्रशासित प्रदेशातील दादरा नगर हवेली या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी झाली. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.

देगलूर विधानसभा निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. 12 उमेदवार रिंगणात असले तरी 3 पक्षात प्रामुख्याने ही लढत होती. अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर (jitesh antapurkar), भाजपचे उमेदवार सुभाष साबणे (Subhash Sabane) तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात होते.

दादरा नगर हवेलीच्या एकमेव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होती. या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली. तर भाजपकडून महेशभाई गावित यांना उमेदवारी दिली. या जागेसाठी तिन्ही पक्षांकडून प्रचारासाठी दिग्गज नेतेमंडळी उतरली होती.

देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय

पहिल्या फेरीपासून मिळवलेली आघाडी कायम ठेवत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकरा यांनी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. अंतापूरकर यांना 30 व्या फेरी अखेर 1 लाख 8 हजार 789 मते मिळाली. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यांना 11 हजार 347 मते मिळाली. जितेश अंतापूरकर यांनी तब्बल 41 हजार 933  मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. 

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  29 व्या फेरीअखेरकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 107329भाजप - सुभाष साबणे – 65772वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 11097- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 41557 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  26 व्या फेरीअखेरकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 97157भाजप - सुभाष साबणे – 59031वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 10466- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  25 व्या फेरीअखेरकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 94221भाजप - सुभाष साबणे – 56959वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 10389- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 37262 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  24 व्या फेरीअखेरकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 90421भाजप - सुभाष साबणे – 54626वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 10201- काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 35795 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : 23 वी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 86850भाजप - सुभाष साबणे – 52425वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 9841- काँग्रेसचे जितेश अंतापूरकरांची आघाडी कायम

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणी : कलाबेन डेलकर यांचा विजयदादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय झाला आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 63,382 मते मिळाली. या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. 

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : 21 वी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 78923भाजप - सुभाष साबणे – 45452वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 8856काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 30266 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : 20 वी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 74821भाजप - सुभाष साबणे – 47058वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 8019काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 27763 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : 19 वी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 70675भाजप - सुभाष साबणे – 45452वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 7668काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 25223 मतांनी आघाडीवर

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेना ऐतिहासिक विजयाच्या दिशेनेदादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. कलाबेन डेलकर 47 हजार 437 मतांनी आघाडीवर आहेत.

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : सतरावी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 63537भाजप - सुभाष साबणे – 40835वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 6953काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 22702 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : सोळावी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 60116भाजप - सुभाष साबणे – 39034वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 6388काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 21082 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : चौदावी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 52599भाजप - सुभाष साबणे – 34857वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 5059काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 17742 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : तेरावी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 48530भाजप - सुभाष साबणे – 32292वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 5059काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 16238 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : बारावी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 44344भाजप - सुभाष साबणे – 30169वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 4464काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : अकरावी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर – 40523भाजप - सुभाष साबणे – 27943वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 4047काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणी : कलाबेन डेलकर आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : दहावी फेरी काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 36592भाजप - सुभाष साबणे – 25623वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 3560काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक : कलाबेन डेलकर यांची आघाडी कायमदादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकरयांची आघाडी कायम, 15 हजार 315 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : नववी फेरी काँग्रेस - जितेश अंतापूरकर – 33068भाजप - सुभाष साबणे – 22486वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले – 3022काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी :  सातव्या फेरीअखेरकाँग्रेस  - जितेश अंतापूरकर - 25376भाजप - सुभाष साबणे -  – 17164वंचित बहुजन आघाडी -डॉ. उत्तमराव इंगोले - 2257जितेश अंतापूरकर 8212 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : सहावी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर काँग्रेस – 4085भाजप - सुभाष साबणे भाजप- 2487वंचित बहुजन आघाडी -डॉ. उत्तमराव इंगोले -335- जितेश अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : पाचवी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर काँग्रेस – 18245भाजप - सुभाष साबणे भाजप- 12077वंचित बहुजन आघाडी -डॉ. उत्तमराव इंगोले -1505- जितेश अंतापूरकर 6168 ने आघाडीवर

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणी : कलाबेन डेलकर 6307 मतांनी आघाडीवरदादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 26 हजार 076 तर भाजपच्या महेश गावित यांना 19769 मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या महेश धोदी यांना 1153 मतं मिळाली आहेत.

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी : चौथी फेरीकाँग्रेस - जितेश अंतापूरकर - 14500भाजप - सुभाष साबणे - 9943वंचित बहुजन आघाडी - डॉ. उत्तम इंगोले - 1225- अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर

देगलूर विधानसभा निवडणूक मतमोजणी - काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर तिसऱ्या फेरीअखेर 3264 मतांनी आघाडीवर- जितेश अंतपुरकर (काँग्रेस)- 3418- सुभाष साबणे (भाजप)-2447- डॉ उत्तम इंगोले (वंचित)- 104

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणी सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये कलाबेन डेलकर या सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 18 हजार 992 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या महेशभाई गावित यांना 13 हजार 486 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार महेशभाई धोडी यांना 747 मते मिळाली आहेत. आता कलाबेन डेलकर यांनी ही आघाडी कायम ठेवल्यास शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर पहिला आमदार मिळण्याची शक्यता आहे. 

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी - दुसरी फेरीजितेश अंतापूरकर- 3078सुभाष साबणे - 2409डॉ. उत्तमराव इंगोले - 449

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी - पहिली फेरी

जितेश अंतापूरकर – 4216सुभाष साबणे – 2592डॉ. उत्तमराव इंगोले – 320

टॅग्स :ElectionनिवडणूकNandedनांदेडlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभा