शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

‘एमपीएससी ’त उत्तीर्ण होवूनही आठ महिन्यांपासून नियुक्तीला विलंब ; उमेदवारांचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 7:56 PM

उत्तीर्ण उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात असून उमेदवारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी येत्या 28 फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे उमेदवार गेल्या आठ महिन्यांपासून घरी उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी कुटुंबिय आझाद मैदानातल्या आंदोलनात सहभागी होणार

पुणे: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 8 महिन्यांहून अधिक कालावधीपासून प्रशासकीय सेवेत रुजू करून घेतले गेले नाही.त्यामुळे उत्तीर्ण उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात असून उमेदवारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी येत्या 28 फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीने घेतलेल्या परीक्षेमध्ये राज्यातील अनेक उमेदवारांची उपजिल्हाधिकारी, पोलीस उपधीक्षक, तहसीलदार आदी पदांवर निवड झाली आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे या उमेदवारांना गेल्या आठ महिन्यांपासून घरी बसावे लागले आहे. एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होवूनही 1 ऑगस्ट 2018 पासून अनेक भावी अधिकारी प्रशिक्षणाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातील काही उमेदवारांनी आपली पूवीर्ची नोकरी सोडून दिल्याने त्यांना मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच काही उमेदवार मानसिक ताण तणावाखाली आहेत.त्यामुळे या उमेदवारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि शासनाने सेवेत लवकर रुजू करून घ्यावे,या मागणीसाठी आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहित घोषित होण्याच्या अगोदर राज्य सरकारने उमेदवारांच्या प्रशिक्षणाबाबत आणि नियुक्तीसंदर्भात निर्णय घ्यावा,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे कुटुंबिय आझाद मैदानात केल्या जाणा-या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीGovernmentसरकार