शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

दिव्यांग विद्यार्थिनींच्या विद्यावेतनाला विलंब

By admin | Published: March 18, 2017 2:06 AM

शासकीय अनुदानित शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थिनींकरिता विद्यावेतन म्हणून २ कोटी ८६ लाख २ हजार इतका निधी जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आला आहे.

- अविनाश साबापुरे, यवतमाळ

शासकीय अनुदानित शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थिनींकरिता विद्यावेतन म्हणून २ कोटी ८६ लाख २ हजार इतका निधी जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आला आहे. मात्र, गटशिक्षणाधिकारी स्तरावरून बँक खात्यांची अचूक माहिती न मिळाल्याने हे पैसे अद्यापही हजारो विद्यार्थिनींपर्यंत पोहोचलेले नाही.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा हा निधी अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींकरिता जिल्हास्तरावर मिळाला आहे. विशेष म्हणजे, अपंग विद्यार्थिनींची अद्ययावत माहिती अभियानाच्या संकेतस्थळावर भरण्याविषयी यापूर्वीच निर्देश देण्यात आले होते. तरीही एकंदर १७ हजार ८३० पैकी १३ हजार ६६६ विद्यार्थिनींचीच माहिती बँक खात्यासह नोंदविण्यात आली. त्यातही शेकडो विद्यार्थिनींचा खाते क्रमांक चुकला आहे. तर, ज्यांचे खाते क्रमांक बरोबर नोंदविले, त्यांच्या बँकेचा आयएफसी कोड चुकलेला आहे. त्यामुळे २ मार्चलाच जिल्हास्तरावर प्राप्त झालेला निधी १७ मार्च उलटल्यावरही गरजू विद्यार्थिनींच्या हाती पडलेला नाही.जिल्हानिहाय वंचित विद्यार्थिनीविद्यावेतनापासून वंचित विद्यार्थिनींची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : यवतमाळ ३२६, अमरावती ६१३, नागपूर ११२८, चंद्रपूर ५६१, वाशिम १८७, अकोला ३३, बुलडाणा २९२, भंडारा ५३०, वर्धा २२४, गोंदिया ३००, गडचिरोली ३११, ठाणे ५५१९, सोलापूर ३८४, सिंधुदुर्ग २७४, सातारा ४१३, सांगली १४०४, रत्नागिरी ४१६, रायगड ३७६, पुणे ११६७, परभणी ३३६, पालघर २२१, उस्मानाबाद ४१५, नाशिक ४९६, नांदेड २४१, लातूर २८८, कोल्हापूर ३०३, जालना ७७, जळगाव १८८, हिंगोली १०४, धुळे १५८, बिड २०७, औरंगाबाद ३०६, अहमदनगर ८६८.नववीपासून पुढील शिक्षण घेण्यासाठी अपंग विद्यार्थिनींना अडचण जाऊ नये, यासाठी प्रतिमहिना २०० रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी २ हजारांचे विद्यावेतन दिले जाते.