मुंबई : विधिमंडळाच्या पदाधिका-यांनी केलेला आॅस्ट्रेलिया, न्यूझिलंडचा दौरा वादग्रस्त ठरलेला असताना विधिमंडळाचे शिष्टमंडळ जर्मनीला जाणार आहे. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ही माहिती दिली. जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ.जुरगेन मोरहार्ड यांनी विधीमंडळात सभापतींची भेट घेऊन त्यांना जर्मनी भेटीचे निमंत्रण दिले.सभापतींनी सांगितले की, दोन्ही देशांतील औद्योगिक संबंध वाढविण्यासंदर्भातही या दौ-यात चर्चा करण्यात येणार आहे. जर्मनीतील स्टूटगार्ट शहर आणि राज्यातील सातारा शहर या शहरांना सिस्टर सिटीचा दर्जा देण्याबाबत शक्यता पडताळून पाहाण्यात येणार आहे.या दौ-यावर जाणा-या शिष्टमंडळात सभापती निंबाळकर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट व अधिका-यांचा समावेश असणार आहे. मात्र दोन देशातील औद्योगिक संबंधांचा आणि विधिमंडळाचा काय संबंध असा टीकेचा सूर भाजपातील काही नेत्यांनी लावला आहे.
विधिमंडळाचे शिष्टमंडळ जर्मनी दौ-यावर, औद्योगिक संबंध वाढविण्यासंदर्भात चर्चा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 5:02 AM