शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जाचक अटी लादणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना हटवा

By admin | Published: March 07, 2016 3:31 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपर आणि गौण खनिज व्यावसायिकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेल्या जाचक अटी आणि त्या विरोधातील आंदोलनाला लागलेले हिंसक वळण, या पार्श्वभूमीवर

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपर आणि गौण खनिज व्यावसायिकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेल्या जाचक अटी आणि त्या विरोधातील आंदोलनाला लागलेले हिंसक वळण, या पार्श्वभूमीवर कोकणातील भाजपा-शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जाणीवपूर्वक हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली. काँग्रेसने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचे प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर आणि पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत या नेत्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली. या वेळी राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, भाजपा प्रवक्ता माधव भांडारी, आमदार वैभव नाईक, प्रमोद जठार, संदेश पारकर आदी नेते उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर झालेल्या लाठीहल्ल्यात वैभव नाईक, राजन तेली, तसेच भाजपा तालुकाध्यक्षांना मारहाण झाली. मुख्यमंत्र्यांना याबद्दल नाराजी दर्शविली आहे, असे माधव भांडारी म्हणाले, तसेच मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी कोकण विभागीय आयुक्त तानाजी संत्रे यांची एकसदस्यीय समिती नेमली आहे. येत्या चार दिवसांत ही समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार असल्याचे भांडारी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सहकार्याने काँग्रेसने गुंड आणून कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेना-भाजपाने केला आहे. या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी आणि त्यांची यंत्रणा जाचक अटी लादून व्यावसायिकांना नाहक त्रास देत आहे. बाँड दिल्यानंतरही जप्तीची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.