अहमदनगर : राज्यातील दलित, मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी वेगाने तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले असून त्याला गृहमंत्री आर.आर. पाटील जबाबदार असल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांना हटविण्याची मागणी खा. हुसेन दलवाई यांनी केली आहे.
आरोपींना शिक्षा होण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत. पोलिसांकडूनच आरोपींना संरक्षण मिळत असून स्वत:च्या खात्यावर पाटील यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी तातडीने पाटील यांना हटवून त्यांच्या जागी दुसरा सक्षम गृहमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी दलवाई यांनी येथे केली.
राज्यात पुन्हा आघाडीचीच सत्ता येणार असून राज्याचे गृहमंत्रीपद काँग्रेस घेणार आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हे कमी होणार नाहीत, असेही ते म्हणाले. खर्डा, सोनई, आष्टी, पुणो आदी ठिकाणी दलित, मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलीस तपासकामी निष्क्रिय झाले आहेत. राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त अडीच टक्के आहे. त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेशात शिक्षेचे प्रमाण अनुक्रमे 35 व 5क् टक्के आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आरशात पाहावा
शिर्डीच्या साईबाबांना सर्व समाज मानतो. त्यांचे जीवन विनयशील, सेवाभावी होते. सेवाभाव वृत्तीमुळेच त्यांनी संतत्व मिळविले. साईबाबांविषयी लोकभावना भडकाविणारे शंकराचार्याचे वक्तव्य निषेधार्ह आहे. शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आधी आरशात पाहावा. वादग्रस्त वक्तव्याने त्यांचा समाजातील आदर कमी झाला आहे. भाजपाचे सरकार आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांना आकाश ठेंगणो झाले आहे, असे दलवाई म्हणाले.
अत्याचाराच्या घटनेनंतर उज्जवल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाते. खैरलांजीचा निकाल काय लागला, यावरून निकम यांची कार्यपद्धतीही संशयास्पद वाटते. त्यामुळे निकम यांची नियुक्ती या प्रकरणात करू नये. सगळ्याच गोष्टींना काही निकम हे एकमेव उत्तर नाही, असे दलवाई म्हणाले.