शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

दाऊदच्या हॉटेल ‘दिल्ली जायका’चा पुन्हा लिलाव?

By admin | Published: January 08, 2016 3:53 AM

कुख्यात गुंड दाऊदच्या मालकीचे हॉटेल ‘दिल्ली जायका’ यशस्वी बोली लावून खरेदी करण्याचा ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांचा प्रयत्न अपयशी ठरला.

मुंबई : कुख्यात गुंड दाऊदच्या मालकीचे हॉटेल ‘दिल्ली जायका’ यशस्वी बोली लावून खरेदी करण्याचा ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांचा प्रयत्न अपयशी ठरला. केंद्र सरकारने केलेल्या लिलावावेळी पुकारलेली रक्कम मुदतीत ते भरू शकले नाहीत. त्यामुळे आता या हॉटेलचा पुन्हा एकदा लिलाव होण्याची शक्यता आहे. महिन्याभरापूर्वी बालाकृष्णन यांनी या हॉटेलसाठी सर्वाधिक ४ कोटी २८ लाख रुपयांची बोली लावली होती. हॉटेलच्या लिलावावेळी ३० लाखांची ठेव जमा केली होती. महिन्याभरात बोलीची संपूर्ण रक्कम भरणे भाग होते.याबाबत बालाकृष्णन म्हणाले, डी गँगकडून मिळालेल्या धमकीमुळे कोणताही उद्योगपती किंवा बिल्डर या प्रकल्पात मदत करण्यास तयार नसल्याने फक्त ४५ लाख रुपये जमा करता आले. यावर लिलावात ४ कोटी २७ लाखांची बोली लावणाऱ्या बुरहड यांना हे हॉटेल खरेदी करण्याचेआवाहन केले होते. मात्र त्यांनीही त्यास नकार दिला. त्यामुळे लोकांकडे पैसा आहे, मात्र त्यांच्यात हिंमत नसल्याने रक्कम जमा होऊ शकली नाही, असा आरोप त्यांनी केला.बालाकृष्णन यांनी प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. लिलावानंतर हॉटेलचे शटर उघडून दाखवण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, हॉटेलची कागदपत्रे दाखवण्यातही प्रशासनाने पारदर्शकता ठेवली नाही. एका व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली माझी माहिती मागितली होती. जीवाला धोका असल्याने प्रशासनाने वैयक्तित माहिती देऊ नये, अशी विनंती केल्यानंतरही एका व्यक्तीला आपल्याबाबत माहिती देण्यात आली. मध्यंतरी आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या आणि धमकीमुळे काही दिवस घराबाहेर पडणे आणि पैसे जमा करण्यात व्यत्यय आला. त्यामुळे पैसे जमा करण्यास आणखी महिनाभराची मुदत देण्यासाठी लेखी निवेदन दिले होते. मात्र मुदतवाढ देण्यासही प्रशासनाने नकार दिल्याचे बालाकृष्णन यांनी म्हटले आहे.