शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

दिल्ली शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारी राजधानी : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 5:42 PM

काही शहरांचा शेतकऱ्यांचे पैसे थकविण्यात नावलौकिक आहे. जुन्नरसह आणखी काही शेतकऱ्यांचे शेतीमालाचे पैसे दिल्लीतील बाजारपेठेतून मिळालेले नाहीत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची फसवणूक होवू नये म्हणून याबाबत अधिक कडक कायदे करावेकेंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांना अनुदान मिळण्यास अडचणी आॅक्टोबर महिन्यात याबाबत इटली,फान्स,जर्मनी आदी देशांना मी स्वत:भेट देणार

पुणे : काही शहरांचा पैसे थकविण्यात नावलैकिक आहे. दिल्लीच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी पाठविलेल्या शेती मालाचे पैसे थकविले जातात. त्यामुळे देशाच्या राजधानीचाही यात समावेश आहे की काय? अशी शंका येत आहे. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये म्हणून याबाबत अधिक कडक कायदे करावे लागतील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. तसेच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दर्जेदार द्राक्ष निर्यात करणारा देश म्हणून भारताने विश्वास संपादन करावा असेही पवार यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ५८ व्या वार्षिक मेळाव्या उद्घाटन समारंभ प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, खजिनदार महेंद्र शाहीर, कैलास भोसले आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, काही शहरांचा शेतकऱ्यांचे पैसे थकविण्यात नावलौकिक आहे. जुन्नरसह आणखी काही शेतकऱ्यांचे शेतीमालाचे पैसे दिल्लीतील बाजारपेठेतून मिळालेले नाहीत. मी दिल्लीत असताना अनेक शेतकरी याबाबत तक्रारी घेवून येतात. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळाले पाहिजेत.याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता असून या संदर्भात अधिक कडक कायदे तयार करावे लागतील.राज्यातील द्राक्षाचे क्षेत्र वाढत चालेले तशा समस्याही वाढत आहेत.शेतक-यांच्या अडचणी शास्त्रज्ञांना समजल्या पाहिजेत.तसेच शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचले पाहिजे.त्यातून द्राक्षाची गुणवत्ता वाढेल व उत्पादनातही वाढ होईल,असे स्पष्ट करून पवार म्हणाले,द्राक्षाच्या निर्यातीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाबरोबर बैठक घेवून त्यावर मार्गदर्शन व सहकार्य मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांना अनुदान मिळण्यास अडचणी येत असली तर त्यासाठीही पाठपुरावा केला जाईल.द्राक्षाचा विचार करता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अजूनही भारताचा वाटा ६ ते ७ टक्क्यांच्या आत आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता असून दजेर्दार वाण वाढवून भारताने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्वत:चा विश्वास निर्माण करायला हवा.त्याचप्रमाणे ऊसाला पर्यायी पिक घेण्याबाबत विचार सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात याबाबत इटली,फान्स,जर्मनी आदी देशांना मी स्वत:भेट देणार आहे.सोपान कांचन म्हणाले, केंद्र शासनाच्या संस्थांचा महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. महाराष्ट्रा ऐवजी दुसऱ्या राज्यांना निधी दिला जात आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत आहेत.दरम्यान कार्यक्रमात द्राक्षवृत्त या अंकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते केले. सुभाष आर्वे यांनी प्रास्ताविक तर कैलास भोसले यांनी आभार मानले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार