शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

महसूल पंधरवड्यामध्ये योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 9:08 PM

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महसूल पंधरवड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहून सर्व विभागांसह चांगले काम करावे.

मुंबई : यावर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी 'महसूल पंधरवडा'  तसेच 'पशुसंवर्धन पंधरवडा' साजरा होत आहे. या कालावधीत शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवा. वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, मुख्यमंत्री माझी लाडके बहीण तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची चांगली अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्यस्तरीय महसूल दिन तसेच महसूल पंधरवडा व पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चा शुभारंभ कार्यक्रम मंत्रालयातील परिषद सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महसूल पंधरवाडा व पशुसंवर्धन पंधरवाडा दोन्हीसाठी नागरिकांना शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी महसूल व पशुसंवर्धन देखील अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. महसूल पंधरवड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहून सर्व विभागांसह चांगले काम करावे.

कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी  अधिक गतीमान, परस्पर समन्वय साधून नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमूख काम करावे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत जावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पशुसंवर्धन पंधरवडामध्ये राज्यातील दूध भेसळीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर अतिशय कठोर काम केले जावे. भेसळ करणाऱ्यांना जरब बसेल, यासाठी कारवाई करावी. महसूल विभागाने सर्व यंत्रणच्या सहकार्याने दाखले व विविध योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अगदी गाव पातळीवर जाऊन काम करावे. वयोश्री योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासह शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

महसूल विभागाने अधिक लोकाभिमुख होऊन काम करावे- उपमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व उपक्रमामध्ये महसूल विभागाचे चांगले योगदान आहे. समाजातील प्रत्येक घटक यामध्ये सहभागी होत आहे. महसूल विभागाने लोकाभिमुख होत अधिक गतीमान पद्धतीने काम करावे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने महसूल पंधरवडा यशस्वी होईल.  पोलीस विभागाच्या धर्तीवर महसूल विभागास देखील जिल्हा नियोजन समितीतून वाहने खरेदीचा निर्णय घेण्यात येत आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवार