लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाटकोपर स्थानकावर मंगळवारी दुपारी अचानक प्रवाशांची एकच गर्दी झाली. टिटवाळा येथून दादरला रुग्णालयात दाखल होण्यासाठी जात असलेल्या गुडिया मोहम्मद अबरार शेख (२८) या महिलेला दुपारी २च्या सुमारास घाटकोपर स्थानकाजवळ प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली. महिलेसोबत असलेल्या व्यक्तींनी महिलेला घाटकोपरला उतरवले आणि काही क्षणांतच त्या महिलेने स्थानकावर गोंडस मुलीला जन्म दिला.ही घटना घडताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ वन रुपी क्लिनिककडे धाव घेतली. त्यानंतर त्या महिलेस या क्लिनिकमध्ये दाखल करून तिच्यावर पुढील उपचार केले. त्यानंतर बाळ आणि आईला राजावाडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वन रुपी क्लिनिकचे मुख्य डॉ. राहुल घुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच, ‘वन रुपी क्लिनिक’मधील ही पहिलीच प्रसूतीनंतरचे उपचार करण्यात आल्याने त्या महिलेकडून कोणतेही शुल्क आकारले नसल्याचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.
घाटकोपर स्थानकावर महिलेची प्रसूती
By admin | Published: July 12, 2017 5:19 AM