मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये चढ-उतार होताना दिसून येत आहे. अशातच कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा सब-लिनियज (उप-वंश) AY.4 चिंता वाढवण्याची शक्यता आहे. मात्र, हा AY.4 चिंताजनक आहे की नाही, याचा तपास अद्याप सुरू आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, भारतात कोविड-19 जीनोम सर्व्हिलांस (Genome Surveillance) दरम्यान एप्रिलमध्ये महाराष्ट्रातून नमुने घेतलेल्या 1 % नमुन्यांमध्ये AY.4 आढळून आला होता. जुलैमध्ये त्याचे प्रमाण 2% आणि ऑगस्टमध्ये 44% पर्यंत वाढले. ऑगस्टपासून विश्लेषण केलेल्या 308 नमुन्यांपैकी 111 (36%) मध्ये डेल्टा (B.1.617.2) आढळला आणि यामधून AY.4 हा 137 नमुन्यांमध्ये (44%) आढळला.
गेल्या आठवड्यात पूर्ण झालेल्या सर्वात अलीकडील जीनोम सिक्वेंसींगमध्ये AY.4 सह अनेक 'डेल्टा डेरिव्हेटिव्ह' सापडले. एका सुत्राच्या मते, "पहिल्यांदा डेल्टा प्लस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेल्टा आणि त्याचे डेरिव्हेटिजला अद्याप वेगळे मानले जात नाही." रिपोर्ट म्हटले आहे की, मुंबई बीएमसीची एक टीम रुग्णांच्या मेडिकल रिपोर्टसह डेल्टा व्हेरिएंटचा रिपोर्ट एकत्र करत आहे, जेणेकरून हे जाणून घेण्यासाठी की या व्हेरिएंटने कोविडची लक्षणे आणि गंभीरता बदलली आहे का? जर तसे असेल तर कसे?
रिपोर्टमध्ये एका डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "कोणताही व्हेरिएंट तेव्हाच चिंताजनक असतो, जेव्हा आम्हाला स्पष्टपणे माहित असेल की त्याचे प्रसारण वाढले आहे किंवा ते संसर्गाचे कारण आहे." बेंगळुरूमध्ये संक्रमित लोकांचे नमुने जीनोम सिक्वेंसींगसाठी शुक्रवारी पाठवले गेले. या काळात तीन लिनियज सापडले, ज्यात डेल्टा आणि त्याचे सब-लिनियज AY.4 आणि AY.12 समाविष्ट आहेत.
स्पाइक प्रोटिनमध्ये 133 म्यूटेशन्सवर जोरस्ट्रँड प्रिसिजन मेडिसिन सोल्युशन्सच्या संशोधकांनी त्यांच्या अलीकडील रिपोर्टमध्ये स्पाइक प्रोटिनमधील 133 म्यूटेशन्सवर सुद्धा जोर दिला आहे. संशोधनात असे आढळून आले की, डेल्टा (B.1.617.2) व्हेरिएंटच्या एकूण नमुन्यांपैकी 52% 19 ते 45 वयोगटातील लोकांचे होते. सब-लीनियज AY.4-34% आणि AY.12-13% मध्ये आढळले. तसेच, मुलांमध्ये, लसीकरण केलेल्या वयस्कर आणि लस न घेतलेल्या लोकांमध्ये आढळल्याचा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
'आम्हाला डेल्टा, AY.4 आणि AY.12 मधील 439-446 पोझिशन्सवर स्पाइक प्रोटीनमध्ये लो फ्रीक्वेंसीवर (> 0.3%<4.5%) अनेक नवीन म्यूटेशन आढळले. यापैकी काही नवीन आहेत आणि अद्याप जागतिक डेटाबेसमध्ये समाविष्ट नाहीत, असे संशोधकांनी सांगितले. बंगळुरू महानगरपालिकेने (बीबीएमपी) गोळा केलेल्या 384 नमुन्यांच्या विश्लेषणात हे समोर आले आहे. दरम्यान, जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट अशा वेळी आला आहे, जेव्हा राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोविड -19 तांत्रिक सल्लागार समितीच्या अलीकडील रिपोर्टमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान साथीच्या तिसऱ्या लाटाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.