शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

तीन रुपयांच्या वादातून थेट ग्रामविकासमंत्र्यांना फोन!

By admin | Published: November 18, 2016 5:14 AM

एका प्रवाशी महिलेकडे येथील स्वच्छतागृहचालकाने गुरुवारी दुपारी तीन रुपये मागत अरेरावी केली.

बीड : बसस्थानकात महिलांना स्वच्छतागृहाची विनामूल्य सोय उपलब्घ करून देण्यात आली आहे. मात्र, एका प्रवाशी महिलेकडे येथील स्वच्छतागृहचालकाने गुरुवारी दुपारी तीन रुपये मागत अरेरावी केली. त्याला धडा शिकवण्यासाठी या महिलेने मोबाइलवरून थेट ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधला. पंकजा यांनीही तातडीने भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना महिलेच्या मदतीस पाठविले आणि मुजोर स्वच्छतागृहचालकाला धडा शिकविला. सुनीता शंकर मुळे (रा. वडीकाळे, ता. अंबड, जि. जालना) असे या प्रवाशी महिलेचे नाव आहे. त्या परळी येथील माहेरहून सासरी जात होत्या. बीड बसस्थानकात स्वच्छतागृहचालक राकेश शर्मा याने त्यांच्याकडे ३ रुपये मागितले.वस्तुत: ही सुविधा विनामूल्य असल्याचे स्वच्छतागृहाच्या दर्शनी भागावर ठळक अक्षरात लिहिलेले आहे. मात्र, शर्मा ऐकायला तयार नव्हता. सुनीता यांनी १०० ची नोट काढून त्याच्या हातावर टेकवली. तरीही तो सुट्या पैशांसाठी हुज्जत घालू लागला. अखेर प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून, सुनीता यांनी पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधला व सर्व परिस्थितीची माहिती दिली. या वेळी मुंबईत असलेल्या पंकजा यांनी तातडीने भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. संगीता धसे यांना तेथे पाठविले. धसे यांनी कानउघाडणी केल्यावर शर्माने सुनीता मुळे यांची माफी मागितली आणि या पुढे महिलांची अडवणूक करणार नाही, असे मान्य केले. (प्रतिनिधी)