ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - सामना दैनिकावर तात्पुरती बंदीची मागणी करणं हे देशात छुप्या पद्धतीनं आणीबाणी लादण्याच्या दिशेनं पाऊल असावे, असं उत्तर सामनानं निवडणूक आयोगाला दिलं आहे. अशा प्रकारची मागणी करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. हिंदुस्थानी घटनेनं दिलेल्या स्वातंत्र्यानुसार नियम आणि कायद्याचं पालन करून सामना 28 वर्षांपासून प्रकाशित होत आहे. निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांच्या चौकटीचा सामना नेहमीच आदर करतो. सामनाबद्दल पूर्वग्रह असणारे आणि सामना विरोधात तक्रारी करणा-यांबाबत आम्हाला काहीच म्हणायचं नाही, असं सामना या वृत्तपत्रानं निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपाच्या श्वेता शालिनी यांची टीकाया प्रकरणावरून भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आचरणाचा प्रभाव पडून शेवटी सामना पारदर्शी झाला, जर सेना पारदर्शक कारभारासाठी तयार झाली असती तर युती तुटली नसती, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आचरणाचा प्रभाव पडून शेवटी सामना पारदर्शी झाला, जर सेना पारदर्शक कारभारासाठी तयार झाली असती तर युती तुटली नसती. pic.twitter.com/hxaT7ObdKM— Shweta Shalini (@shweta_shalini) February 19, 2017