शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

कल्याणमधील मेट्रो रेल्वेचा मार्ग चुकीचा, नवा डीपीआर तयार करण्याची मागणी

By admin | Published: November 01, 2016 4:52 PM

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. कल्याणमध्ये मेट्रोचा मार्ग चुकीचा आहे.

ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 01 - ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. कल्याणमध्ये मेट्रोचा मार्ग चुकीचा आहे. तो दुरुस्त करण्यात यावा. त्याचा नवा डीपीआर तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. एकदा मंजूरी मिळाल्यावर त्यात बदल करण्याच्या मागणीची मुख्यमंत्री दखल घेणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मेट्रोचा मार्गाचा फायदा भिवंडीला होणार आहे. कल्याण पश्चिमेतील नागरिकांना त्याचा फायदा कमी होईल असे पाटील यांनी मत मांडले आहे. सध्या मंजूर करण्यात आलेल्या कल्याण भिंवडी ठाणे मेट्रो रेल्वेचा मार्ग पहिले स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर सहजानंद चौक आणि दुर्गाडी असे आहे. त्याऐवजी त्यात बदल करुन स्टेशनमार्गे मुरबाड रोड, सिंडीकेट, भवानी चौक, बिर्ला गेट, खडकपाडा, आधारवाडी आणि दुर्गाडी असा असावा. बाजारसमिती, सहजानंद चौक आणि दुर्गाडी मार्गे केल्यास त्याचा फायदा आधारवाडी, खडकपाडा, बिर्ला गेटच्या व मुरबाड रोडवरील नागरिकांना होणार नाही. हा मार्ग भवानी चौकातून फिरवल्यास शहाडनजीकच्या लोकांनीही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मेट्रेच्या मार्गात त्वरीत बदल करण्यात यावा. तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांना द्यावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
मेट्रो मंजूर करण्याच्या श्रेयाचा वाद चांगला रंगला आहे. मेट्रो मंजूर होताच कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात भाजपचे खासदार कपिल पाटील व आमदार
नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारे फलक लावले होते. त्यात त्यांनी केलेल्या मागणीनुसार मेट्रो मंजूर करण्यात आली असे नमूद केले होते. मेट्रो मंजूर झाल्यावर डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी ठेंगा दाखविल्याची जोरदार टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील व प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली. त्यांच्या टीकेची दखल शिवसेनेला घ्यावी लागली. या श्रेयाच्या राजकारण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे पोहचले. त्यांनी कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेची व्यवहार्यता तपासण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भाग पाडले. पोखरण-माजीवडा-खारेगाव-मुंब्रा-शीळ या मार्गाचीही केली मागणी आहे. याच अर्थ असा की, ठाणो, भिवंडी, कल्याण, तळोजा, शीळ, मुंब्रा, खारेगाव, माजीवडा, पोखरण असा भला मोठा मेट्रोचा एक सर्कल पूर्ण करण्याचा त्यांचा उद्देश आहे. शिवसेनेच्या पाटील यांनी मेट्रोचा कल्याणमधील मार्ग चुकीचा असल्याचा मुद्दा उपस्थि करुन वसेनेला घरचा आहेर दिला आहे. पाटील यांच्या मेट्रो रेल्वेच्या चुकीच्या मार्गाच्या मुद्यापूर्वी कोण-दुर्गाडी हा कल्याणखाडीवरी सहा पदरी पूलाची नियोजीत जागा चुकल्याचा मुद्दा शिवसेनेचे नगरसेवक सुधीर बासरे यांनी उपस्थित केला आहे. मेट्रो ही उंचमार्गिका (एलिव्हेटेड) असणार आहे. आहे त्याच मार्गावरुन मेट्रो उभारली जाणार आहे. मेट्रोमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असली तरी 2010 सालापासून महापालिका हद्दीत सुरु असलेले सिमेंट क्रॉन्क्रीटीकरणाच्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. हे काम आत्ता पूर्ण होत असताना पुन्हा मेट्रोच्या काम हाती घेतल्यावर रस्ते वाहतूक  कोंडीचा सामना कल्याण पश्चिम व कल्याण भिवंडी बायपास रोडवर करावा आखणीन चार वर्षे करावा लागणार आहे. याशिवाय कोन गाव ते शीळ हा एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येणार आहे. कल्याण तळोजा ही मेट्रो रेल्वे सुरु करण्यासाठी जो मार्ग तयार करायचा आहे तो देखील अस्तित्वात असलेल्या कल्याण शीळ मार्गावर एलिव्हेटेड असणार आहे. एक रस्ता आणि रेल्वे मार्ग हे दोन्ही एलिव्हेटेड असल्याने त्याचे नियोजन कसे करायचे अथवा काय असेल याची सुस्पष्टता एमएमआरडीएने केलेली नाही. त्याचे नियोजन एमएमआरडीएला करायचे आहे. 
डोंबिवली शहरापर्यंत मेट्रो आणली नाही. त्यामुळे मनसे सत्ताधारी पक्षावर चांगलेच तोंडसूख घेतले. मात्र सत्ताधारी भाजपने मेट्रो ऐवजी डोंबिवली मोठ गाव ठाकूर्ली ते माणकोली हा खाडी पूल उभारला जाणार आहे. त्याचे भूमीपूजन करण्यात आले आहे. डोंबिवलीकरांना या मार्गे भिवंडी जाऊन अथवा कल्याणला येऊन मेट्रोने प्रवास करता येईल असे स्पष्टीकरण दिले आहे. 2014 सालच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रो अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर्पयत आणली जाईल असे आश्वासन दिले होते.
आघाडीने केवळ मेट्रोचे स्वप्न दाखविले. ते भाजप सरकराने पूर्णत्वास नेल्याचे भाजपचे म्हणणो आहे. त्यांनी मेट्रो कल्याणर्पयत आणून डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमधील नागरीकांचा भ्रमनिरास केला आहे. शिवसेननेचे खासदार शिंदे यांनीही केवळ कल्याण डोंबिवलीचा विचार केला आहे. वास्तविक पाहता त्यांच्या कल्याण मतदार संघात उल्हासनगर व अंबरनाथ हा भाग येतो. त्याचाह विचार टप्प्या टप्प्याने केला जाईल असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.