मुंबई - ऐन कोळसा टंचाईत विजेची वाढती मागणी व उपलब्धतेमधील तूट भरून काढण्यासाठी करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजनास यश येत असून, मागणीएवढा विजेचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे राज्यात विजेचे भारनियमन आटोक्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिल्याचेही महावितरणने म्हटले आहे.
महावितरणने विजेची मागणी व उपलब्धता याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. कोणत्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून व कोणत्या स्रोताकडून प्रत्येक तासाला किती वीजपुरवठा उपलब्ध होत आहे, याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. मागणीएवढी वीज उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागणी व उपलब्धततेत तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. प्रयत्नांमुळे भारनियमनाचे योग्य व्यवस्थापन करून विजेची उपलब्धतेमध्ये वाढ करण्यात यश येत आहे. भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून तासागणिक आढावा घेतला जात आहे. शनिवारी किती मागणी; कोणाकडून किती वीज मिळाली ?२४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी होती.महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३८० मेगावॅटकेंद्राकडून ६१०२ मेगावॅटउरण गॅसमधून २१३ मेगावॅटकोयना जलविद्युत प्रकल्पातून ११३४सीजीपीएलकडून ६२२ मेगावॅटजीएमआरकडून २०० मेगावॅटअदानीकडून २९५१ मेगावॅटरतन इंडियाकडून १२०० मेगावॅटपॉवर एक्सचेंजमधून ४२६ मेगावॅटसाई वर्धाकडून २४० मेगावॅटबाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १२२६ मेगावॅटराज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून ९१५ मेगावॅटपवन ऊर्जा प्रकल्पांकडून ८५ मेगावॅटसहवीज निर्मितीतून ९९६लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून २२७ मेगावॅटरिअल टाइम मार्केटमधून ४२४ मेगावॅट