लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हॉटेल्स आणि बार चालकांवर वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) मोठे ओझे टाकण्यात आले असून, ते कमी करण्याची मागणी पुणे रेस्टॉरंट अॅण्ड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नुकतीच जावडेकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. जीएसटीनुसार शीतीकरण नसलेल्या हॉटेल्समध्ये १२ टक्के कर आकारण्यात येणार आहे. त्यात ५ पर्यंत घट करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मद्यविक्री करणाऱ्या आणि शीतीकरणाची सुविधा असलेल्या हॉटेल्सवर १८ टक्के कर लागू करण्यात आला आहे. त्यात १२ टक्क्यांपर्यंत घट करावी असे निवेदनात म्हटले आहे. करसवलतीची वार्षिक उलाढालीची मर्यादा एक कोटी रुपये करावी, अशी मागणी आहे. याबाबतचे निवेदन जावडेकर यांना देण्यात आले.
हॉटेल्सवरील जीएसटी कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:34 AM