लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून सरकार चालढकल करीत आहे. वर्षभरात केवळ चर्चाच सुरू आहे. चर्चेच्या फेºया थांबवून तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारला ताकद दाखवावी लागेल, असा सूर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांत उमटला. कोल्हापुरातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वर्षपूर्तीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी समाजबांधव जमले होते.आमदार सतेज पाटील म्हणाले, सरकारकडून आरक्षणाच्या प्रश्नावर चालढकल सुरू आहे. सरकार आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी निवडणुकांची वाट पाहात आहे. सरकारची मानसिकता तपासणे गरजेचे आहे. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, सरकारकडून आरक्षणासह अन्य मागण्यांबाबतही टोलवाटोलवी केली जात आहे. समाजामध्ये दिल्लीतील तख्त हलविण्याची ताकद आहे.रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, लाखोंच्या संख्येने मोर्चासह आंदोलन करूनही समाजाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आरक्षणासह इतर मागण्याही मागे पडत आहेत. त्यामुळे समाजाची ताकद पुन्हा एकदा दाखवावी लागेल. या वेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 4:22 AM