मुंबई : शिवसेनेची भूमिका मनसे हायजॅक करत आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याचे कारण म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्याची शिवसेनेची कित्येक दिवसांची मागणी असताना, हिच मागणी आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे हा प्रस्ताव कित्येक दिवसांपासून शिवसेनेचा होता. मात्र आता आमदार राजू पाटील यांनी संभाजीनगर या नावासाठी आग्रह धरला आहे. तर याचवेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा सुद्धा साधला आहे.
आमदार पाटील म्हणाले की, शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यातही होता. मात्र असे असताना सुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेने फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे पाटील म्हणाले.
मात्र आता आम्ही यासाठी पुढाकर घेणार असून राज्य सरकाराला औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडणार असल्याचे पाटील म्हणाले. तसेच येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा आपण मांडणार असल्याचे सुद्धा राजू पाटील म्हणाले.