पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) फिटनेस प्रमाणपत्र नसताना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेस मार्गावर आणल्या जात आहेत. तसेच नादुरुस्त बसेस रस्त्यावर आल्याने बंद पडण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीसह अपघाताची शक्यताही वाढते. याला आवर घालण्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलावीत, अशी मागणी पादचारी प्रथम संस्थेचे निमंत्रक प्रशांत इनामदार यांनी केली आहे.शहरात पीएमपीच्या बसेस रस्त्यावर बंद पडून वाहतूककोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शनिवारी रात्री गर्दीच्या वेळी दोन बसेस शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात, तर एक बस कृषी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर बंद पडली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर इनामदार यांनी वाहतूक पोलीस व आरटीओकडे पीएमपी व्यवस्थापनाशी बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
‘पीएमपी’ला आवरण्याची मागणी
By admin | Published: April 19, 2016 12:55 AM