शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पोशीर ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी

By admin | Published: November 03, 2016 2:36 AM

पोशीर ग्रामपंचायतीची दप्तर दिरंगाई आणि त्यावर पंचायत समितीने केलेली शून्य कारवाई प्रशासकीय अधिकाऱ्यांना भोवण्याचे संकेत मिळत आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यातील मुद्रांक शुल्क प्रकरणी विशेष चर्चेत असलेल्या पोशीर ग्रामपंचायतीची दप्तर दिरंगाई आणि त्यावर पंचायत समितीने केलेली शून्य कारवाई प्रशासकीय अधिकाऱ्यांना भोवण्याचे संकेत मिळत आहेत. कार्यालयीन अभिलेख तपासणीसाठी अद्ययावत न ठेवता उलट दप्तर चौकशीला दांडी मारणाऱ्या ग्रामविकास अधिकारी डी. के. कोळसकर यांच्याबद्दल ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर तक्रारीची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, तसेच पोशीर ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ प्रवीण शिंगटे यांनी केली असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.पोशीर ग्रामपंचायतीतील मनमानी व बेकायदा कारभाराचा पर्दाफाश करणारे निवेदन प्रवीण शिंगटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांना दिले असून त्यात कर्जत पंचायत समितीच्या नियंत्रणशून्य कारभारावरदेखील ताशेरे ओढले आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतीच्या आर्थिक बाबीवर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने नेमलेला प्रशासकीय अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचा सचिव, जनमाहिती अधिकारी यापैकी एकही भूमिका धड न निभावणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बेशिस्त वर्तनाचा व बेदरकार वृत्तीचा कळस झाला आहे. पोशीर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारावर कर्जत पंचायत समितीचे कसलेच नियंत्रण नसल्याचा आरोप प्रवीण शिंगटे यांनी केला आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या ग्रामसभांचे एकही इतिवृत्त या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सादर केले नसल्याचे आढळून आले, तसेच मागील सहा महिन्यांच्या मासिक सभांचे अहवाल देखील तयार नाहीत. इंदिरा आवास घरकूल योजना, अपंग निधी, शौचालय लाभार्थी यादीत केलेला घोळ अशा अनेक महत्त्वपूर्ण योजनांचे वाटोळे करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची मेहेरनजर असल्याने कधीच कारवाई झाली नाही. ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.डी. के.कोळसकर हे पोशीर ग्रामपंचायतीचे जनमाहिती अधिकारी आहेत. गेल्या तीन आर्थिक वर्षातील मुद्रांक शुल्क व त्याचा विनियोग याची माहिती ग्रामस्थांना देण्यास टाळाटाळ करणे, ग्रामनिधी व त्याचा विनियोग, पाणीपट्टी वसुली व त्याचा विनियोग, पर्यावरण निधीवर करण्यात आलेला खर्च, अर्थसंकल्प आर्थिक जमाखर्च सादर न करणे, माहिती देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करणे, अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्र ारी निवेदनात करण्यात आल्या आहेत. प्रवीण शिंगटे यांचा आमरण उपोषणाचा इशारा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार तपासणीची कार्यवाही करावी. सर्व अभिलेख सुरक्षित आहेत अथवा नाहीत याची तपासणी व्हावी. ग्रामविकास अधिकारी कोळसकर यांनी हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित करण्याची मागणी प्रवीण शिंगटे यांनी या निवेदनात केली आहे.ग्रामविकास अधिकारी यांच्या बेशिस्त कारभाराची चौकशी करून त्यांची सेवा समाप्त करण्यात न आल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एस. ए. मोकाशी यांच्याशी अनेकवेळा संपर्ककरूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.>एक जागरूक नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणाची सखोल व नि:पक्षपाती चौकशी व्हावी.-प्रवीण शिंगटे, तक्र ारदार ग्रामस्थ, पोशीर