मुंबई : राज्यातील सध्याची कायदा व सुव्यवस्था स्थिती पाहता राज्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या काही तुकड्या पाठवाव्यात, असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृह सचिवांना पाठविले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यात गेल्या दोन दिवसांत आमदारांची कार्यालये, घरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. विशिष्ट राजकीय पक्षांचे काही नेते धमकावत आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. अशा वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या काही तुकड्या राज्यात पाठविणे आवश्यक वाटते, असे राज्यपालांनी या पत्रात म्हटले असल्याचे समजते. राज्यात गेल्या दोन दिवसांत ज्या घटना घडल्या आहेत त्यापैकी काही घटनांमध्ये राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले पोलीस मूक साक्षीदार बनल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवरही केंद्रीय राखीव पोलीस दलाची गरज असल्याचे मत राज्यपालांनी या पत्रात व्यक्त केले असल्याची माहिती आहे.
केंद्रीय सुरक्षा दल पाठवण्याची मागणी, राज्यपालांचे केंद्रीय गृह सचिवांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 5:15 PM