शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

तिकिटासाठी भाजपाकडून दोन लाख रुपयांची मागणी!

By admin | Published: February 05, 2017 4:19 AM

केंद्र व राज्यात सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाने एबी फॉर्म

नाशिक : केंद्र व राज्यात सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाने एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांकडे प्रत्येकी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाल्याने पक्ष अडचणीत आला आहे. भाजपाने हा पक्षनिधी असल्याची सारवासारव केली आहे. पक्षाने प्रथमच उमेदवारी यादी जाहीर न करता, वैयक्तिक पातळीवर त्यांना एबी फॉर्म वाटले, तर काहींना उमेदवारी घेण्यासाठी पक्षाच्या येथील ‘वसंतस्मृती’ कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी पक्षाचे सरचिटणीस नाना शिलेदार यांच्यावर उमेदवारांचे नाव, पत्ता व माहिती घेण्याची व पक्षाने निश्चित केलेल्यांना एबी फॉर्म देण्याची जबाबदारी सोपविली होती. शिलेदार हे उमेदवारी मागणाऱ्यांकडून दोन लाखांची मागणी करीत असल्याची ध्वनिचित्रफित शनिवारी व्हायरल झाली. शिलेदार यांनी दोन लाखांची मागणी तर केलीच, परंतु पैसे नसतील, तर बाजूला व्हा, कोणाशी बोलायचे ते बोला, असे खडे बोलही इच्छुकाला सुनावल्याचे व्हिडीओत दिसत आहे. भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्या कन्येला पक्षाने उमेदवारी नाकारल्याने, त्यांनी अशाच प्रकारचा आरोप पक्ष नेतृत्वावर केला आहे. यामुळे बदनाम झालेल्या भाजपा नेत्यांकडून आता सारवासारव केली जात आहे. सदरचे पैसे पक्षाच्या संबंधित उमेदवारांच्या प्रचारासाठीच खर्च होणार असल्याचे काही जण खासगीत सांगताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)काय आहे व्हिडीओत..?भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात एका केबीनमध्ये शहर सरचिटणीस नाना शिलेदार बसले असून, त्यांच्याकडे गेलेल्या इच्छुकाकडे ते दोन लाख रुपयांची मागणी करतात. इतकेच नव्हे, तर या रकमेचा चेक द्या, असेही त्यात सुचविले आहे. एका इच्छुक उमेदवारानेच हा व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचे सांगण्यात येत आहे.आ. सीमा हिरे यांचे घूमजावव्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आ. सीमा हिरे यांनी सुरुवातीला वादग्रस्त प्रतिक्रिया देत पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी घूमजाव केले. कदाचित, हे पैसे पार्टी फंड वगैरे असेल, असे त्या म्हणाल्या.सानप यांचा मोबाइल स्विच आॅपवादग्रस्त शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याशी संपर्क साधला असता, सुरुवातीला त्यांनी दहा मिनिटांत फोन करतो, असे सांगितले. नंतर मोबाइल स्विच आॅफ केला होता. - हा तर पक्षनिधी : देवयानी फरांदे यांची सारवासारव- आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मात्र, हा पक्षनिधी आहे. निवडणुकीच्या प्रचारसाठी तो वापरला जातो, असे सांगून सारवासारव केली.