शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

मागण्यांचे सोंग पुरे; आता पाठपुरावा करा

By admin | Published: February 22, 2016 4:28 AM

नाट्यसंमेलनामध्ये नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्याविषयीच्या अनेकविध मागण्या नाट्य परिषद करते; मात्र, त्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जात नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) : नाट्यसंमेलनामध्ये नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्याविषयीच्या अनेकविध मागण्या नाट्य परिषद करते; मात्र, त्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जात नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाट्य परिषदेला लगावला. ठाण्यातील मासुंदा तलावात अ‍ॅम्फी थिएटर, शतकमहोत्सवी संमेलन ठाण्यात घेतल्यास मेट्रो रेल्वेतून संमेलनास हजर राहण्याचा शब्द आणि अन्य मागण्यांसाठी बैठक, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.९६व्या अ.भा. नाट्यसंमेलनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांना बैठकीकरिता जायचे असल्याने अन्य वक्त्यांनी भाषणे अक्षरश: आटोपती घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, नाट्य परिषदेच्या मंडळींनी माझ्याकडे बॅकस्टेज आर्टिस्टच्या घरांपासून परिषदेच्या भूखंडापर्यंत अनेक मागण्या केल्या. मात्र, नाट्य परिषदेच्या मंडळींची व मुख्यमंत्र्यांची भेट केवळ नाट्यसंंमेलनाच्या समारोपावेळी होते. त्यामुळे मागच्या संमेलनात काय बोललो, ते पुढच्या संमेलनात आम्हाला आठवत नाही. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांनी अशाच मागण्या केल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातील साऱ्यांनी होकार भरला होता. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी लवकरच मंत्रालयात सर्व संबंधितांची बैठक बोलावतो आणि सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनाही त्याकरिता पाचारण करतो, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. पुढच्या वेळी मेट्रोने येईनसाहित्य अथवा नाट्यसंमेलन असो, अलीकडे मूळ विषय बाजूला पडून वेगळ्याच विषयावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, ठाण्यातील हे संमेलन वादातीत राहिले. ठाणे शहर सांस्कृतिक शहर असले तरी ९६ वर्षांत या शहराला संमेलनाचा मान मिळाला नाही, असे नमूद करून ते म्हणाले, नाट्यसंमेलनाचे शतक ठाण्यातच साजरे व्हावे. त्यासाठी मी मेट्रोत बसून ठाण्याला येईन, असा शब्द देत आहे. महापालिका आयुक्तांनी मासुंदा तलावात अ‍ॅम्फी थिएटर उभारण्याचा प्रस्ताव मला पाठवल्यास तो मी मंजूर करेन, असेही ते म्हणाले.शरद पवार, विनोद तावडे अनुपस्थित संमेलनाच्या समारोप सोहळ्यास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, गृहराज्यमंत्री राम शिंदे आदी मान्यवरांनी दांडी मारली. आमदारांनी नाट्यस्पर्धा घ्यावीराज्यातील प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारक्षेत्रात नाट्यस्पर्धा घ्यावी, त्यातून निवडलेल्या नाटकांमधून सर्वोत्कृष्ट नाटके निवडली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त करून नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी राज्यव्यापी नाट्यचळवळीचा एक उपक्रम सुचवला.