शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड

By admin | Published: January 19, 2016 4:10 AM

पुढील वर्षीच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल, या शब्दांत रावसाहेब दानवे यांनी आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी तीन वर्षांसाठी फेरनिवड होताच मित्रपक्ष शिवसेनेला डिवचले.

मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा : शिवसेनेला डिवचलेमुंबई : पुढील वर्षीच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल, या शब्दांत रावसाहेब दानवे यांनी आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी तीन वर्षांसाठी फेरनिवड होताच मित्रपक्ष शिवसेनेला डिवचले. प्रदेशाध्यक्षपदी दानवे यांचीच फेरनिवड होणार, असे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात दिले होते. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी केवळ दानवे यांचाच अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.त्या वेळी कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्यांच्या गजरात जल्लोष केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दानवे, केंद्रीय निरीक्षक मुख्यमंत्र्यांकडून दानवेंची प्रशंसासरकार आणि भाजपा संघटनेत दानवे यांनी चांगला समन्वय त्यांनी राखला आहे. शासकीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून पक्षाचे कार्यकर्ते झटत आहेत. दुष्काळग्रस्त भागात पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला चांगले यश मिळाल्याचे फडणवीस म्हणाले.

खा.पुरुषोत्तम रुपाला, निवडणूक संयोजक सुजितसिंह ठाकूर , महसूल मंत्री एकनाथ खडसे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विद्या ठाकूर आदी उपस्थित होते. 
निवडीनंतर पत्रकारांनी त्यांना मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती करणार का, असे विचारले असता दानवे म्हणाले, अजून काहीही ठरलेले नाही. निवडणुकीची रणनीती इतकी आधी ठरत नसते. ती वेळेवर ठरवायची असते. राजकीय चाली या वेळेवर चालायच्या असतात. 
पण मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार असे वक्तव्य करून आपण शिवसेनेला डिवचत नाही का या प्रश्नात दानवे म्हणाले की, अहो! त्याची आम्हाला एकमेकांना सवय झाली आहे. आमच्यात समन्वयदेखील चांगला आहे. उद्धव ठाकरे आम्हाला मार्गदर्शन करत असतात. (विशेष प्रतिनिधी)