लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : मटक्याचे आकडे छापून जुगार खेळण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा दैनिकांविरुद्ध सोलापूर पोलीस आयुक्तालयाने मंगळवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी गेल्या मार्चमध्ये विजापूर नाका पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला होते.सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी यांनी फिर्याद दिली होती. सोलापूर शहरातील दैनिक संचार, पुण्यनगरी, सुराज्य, केसरी, दैनिक जनप्रवास, तरुण भारत अशी गुन्हा दाखल झालेल्या दैनिकांची नावे आहेत. या दैनिकांनी मुंबई व कल्याण अंक, आकडे छापून त्याद्वारे अवैध मटका बेटींगचे आकडे, निकाल प्रसिद्ध करुन ते वितरित करून नागरिकांना मटका खेळण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झालेल्या संपादक व मालकांची नावेसंचार-धर्मराज काडादी (मालक), जयप्रकाश अभंगे (वृत्तसंपादक), पुण्यनगरी-अरविंद मुरलीधर शिंगोटे (मालक व संपादक), सुराज्य-राकेश टोळ्ये (मालक), कार्यकारी संपादक राजकुमार नरुटे, तरुण भारत-विवेक घळसासी (चेअरमन), तत्कालीन संपादक नारायण कारंजकर, मुद्रक, प्रकाशक दिलीप दुलंगे, संपादक विजयकुमार पिसे, दैनिक केसरी डॉ. दीपक टिळक (मालक), कार्यकारी संपादक सुकृत खांडेकर आणि दैनिक जनप्रवास संजय भोकरे (मालक व संपादक).
मटका आकडे छापणाऱ्या सहा दैनिकांविरुद्ध दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 1:45 AM