नाशिक : शहरात आजारांची साथ सुरूच असून डेंग्यु रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडय़ात डेंग्युचे 41 रूग्ण आढळले असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या तोंडावर पालिकेला डेंग्यु रोखण्यात अपयश आले आहे.
ऑक्टोबरच्या पंधरवडय़ात पालिकेच्या वैद्यकीय अहवालानुसार 124 संशयित रूग्ण आढळले होते. 77 जणांच्या रक्त चाचणी अहवालानंतर त्यातील 44 जणांना डेंग्यु झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यात डेंग्यु रूग्णांच्या संख्येत नाशिक महापालिकेचा 23 वा क्रमांक आहे. राज्यात पुणो महापालिका क्षेत्रत सर्वाधिक अडीचशे डेंग्युचे रूग्ण आढळले आहेत. पालिकेच्या सर्वेक्षणात अन्य आजारही बळावल्याचे दिसत आहे. स्वाईन फ्ल्यूचे तीन तर तापाचे 1,328 रूग्ण आढळले आहेत. अतिसार, विषमज्वर झाल्याचे प्रकारही आढळल्याचे पालिकेच्या सूत्रंनी सांगितले. (प्रतिनिधी)
धुळ्यात आढळले 3क् रुग्ण
धुळे : शहरातडेंग्यूचे 3क् रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. तक्रारी वाढल्याने अखेर आयुक्तांना याबाबत शुक्रवारी आढावा बैठक घ्यावी लागली. शहरातील विविध खाजगी रुग्णालयात डेंग्यूचे 3क् रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
हिंगोलीत पाच रूग्ण
हिंगोली : जिलत दोन महिन्यांपासून डेंग्युची साथ सुरू असून, गेल्या दोन दिवसात 5 रूग्ण आढळून आले आहेत़ त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोली येथील रूपाली सरकटे (24) हिला 9 ऑक्टोबर रूग्णालयात दाखल करण्यात आले. औंढा नागनाथ येथील यमूनाबाई नागरे(5क्) यांच्या शरीरातील पेशींची संख्या अचानक कमी झाली़़, तर अमोल भागवत खोरणो (2क्) आणि पुनम अग्रवाल (12) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर सुरेखा कुरवाडे (4क्) यांना नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.