शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

डेंग्यू आणि क्षयरोगाचा विळखा

By admin | Published: July 13, 2017 1:56 AM

मुंबईमध्ये क्षयरोग (टीबी) आणि डेंग्यूने थैमान घातल्याची श्वेतपत्रिका प्रजा फाउंडेशनने बुधवारी जाहीर केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईमध्ये क्षयरोग (टीबी) आणि डेंग्यूने थैमान घातल्याची श्वेतपत्रिका प्रजा फाउंडेशनने बुधवारी जाहीर केली आहे. क्षयरोगामुळे गेल्या वर्षभरात दररोज साधारण १८ लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब प्रजाने माहिती अधिकारात उघड केली आहे. तर डेंग्यूच्या रुग्णांतही गेल्या पाच वर्षांत अडीच पटीने वाढ झाल्याचे भीषण वास्तव प्रजाने समोर आणले आहे.प्रजाने जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेनुसार, क्षयरोगाच्या रुग्णांत सुमारे १४ हजार रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१२-१३ साली ३६ हजार ४१७ क्षयरुग्ण असलेल्या मुंबईला क्षयमुक्त करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. कारण गेल्या चार वर्षांत क्षयरुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली असून, क्षयरुग्णांचा आकडा तब्बल ५० हजारांवर गेला आहे. तर दररोज सरासरी १८ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने होत असताना क्षयनिर्मूलनासाठी असलेल्या डॉट्स केंद्रांत येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१२ साली ३० हजार ८२८ रुग्ण डॉट्स केंद्रांत उपचार घेत होते. याउलट २०१६मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५ हजार ७६७पर्यंत घसरली आहे.गेल्या पाच वर्षांत डेंग्यूनेही मुंबईत हात-पाय पसरल्याची माहिती या वेळी समोर आली आहे. २०१२-१३ सालात डेंग्यूच्या ४ हजार ८६७ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यात २६५ टक्क्यांनी वाढ होत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २०१६-१७मध्ये तब्बल १७ हजार ७७१ रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे डेंग्यूला आळा घालण्यात महापालिकेला अपयश आल्याचे दिसते.नगरसेवक उदासीनक्षयरोगाबाबत नगरसेवकांमध्येही उदासीनता दिसत असल्याचे प्रजाचे म्हणणे आहे. कारण माहिती अधिकारात उघड झालेल्या माहितीनुसार, डॉट्समध्ये क्षयरोगाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दरवर्षी १० टक्क्यांनी गळती होत आहे. तरीही गेल्या पाच वर्षांत महापालिकेत नगरसेवकांनी क्षयरोगावर केवळ ४५ प्रश्न विचारले आहेत. याउलट रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंदे्रयांच्या नामकरणाबाबत नगरसेवकांनी ६८ प्रश्न विचारले आहेत. यावरून नगरसेवकांना रुग्णालयातील सेवेहून त्याचे नाव अधिक महत्त्वाचे वाटते, असा निष्कर्ष निघतो.>८९,८१८ मुंबईकरांचा गतवर्षी मृत्यूएप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या काळात ८९,८१८ मुंबईकरांनी मृत्यू झाल्याची नोंद पालिकेत आहे. त्यात मलेरियामुळे १२७ मृत्यू झाले.डेंग्यूमुळे जीव गमावलेल्या नागरिकांची संख्या १४८ आहे. क्षयरोगाने तब्बल ६ हजार ४७२ रूग्णांचा जीव घेतला.अतिसारामुळे २२५ मुंबईकरांना जीव गमवावा लागला. कॉलरामुळे ८, तर टायफॉईड ६ आणि एचआयव्ही एड्समुळे ४०४ रूग्णांचे जीव गेले.मधुमेहामुळेही एकूण २ हजार ६ ७५ नागरिकांचा मृत्यूू झाल्याची नोंद आहे.हायपर टेन्शनमुळे तब्बल ४ हजार ४३८ नागरिकांचा अकाली मृत्यू झाला आहे.७५ हजार ३१५ मुंबईकरांच्या मृत्यूची नोंद इतर कारणाने झाली आहे.>डेंग्यूके पूर्व वॉर्डमध्ये २२४ रुग्ण आढळले.एल वॉर्डमध्ये १४४ रुग्णांची नोंद आहे.आर उत्तर वॉर्डमध्ये १०८ रुग्णांना डेंग्यू झाला.क्षयरोग एल वॉर्डमधील कुर्ला परिसरात टीबीचे १ हजार २५४ रुग्ण आढळले आहेत.एच पूर्व वॉर्डमधील सांताक्रुझ विभागात ६५९ रुग्णांची नोंद आहे.आर दक्षिण वॉर्डमधील कांदिवलीमध्ये ४९३ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदर्शनास आले आहे.अतिसाराचा चिमुरड्यांना धोकामुंबईतील चिमुरडे अतिसाराचे बळी पडत असल्याचेही प्रजाने उघड केले आहे. कारण अतिसारामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये सुमारे ३ पैकी १ मृत्यू हा ४ वर्षे व त्याखालील वयाच्या बालकांचा आहे.