मेयोत डेंग्यूचे निदान बंद : डागावर वाढला भारनागपूर: राज्यात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येत नागपुरातील खासगी इस्पितळांसह मेयो व मेडिकलमध्ये येत आहेत. डेंग्यूच्या शासकीय नोंदीसाठी ‘इलिझा’ चाचणी करणे बंधनकारक आहे. याची जबाबदारी मेयोच्या प्रयोगशाळेवर देण्यात आली आहे, परंतु मागील पाच दिवसांपासून येथील ‘इलिझा रिडर’ बंद पडले आहे, परिणामी संशयित रुग्णांचे नमुने डागा रुग्णालयाकडे पाठविले जात आहे. मागील पाच दिवसांत डेंग्यू संशयित रुग्णांचे सुमारे ३०० नमुने तपासण्यात आले असून ८८ रुग्णाला डेंग्यू असल्याचे निदान झाले आहे. शहरात डेंग्यू रु ग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही रु ग्णांचा मृत्यूही झाला आहे. मात्र, प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. खाजगी डॉक्टरांनी डेंग्यूच्या रु ग्णांची माहिती मनपाला देणे बंधनकारक आहे, मात्र याविषयी अनेक इस्पितळे गंभीर नसल्याने महापालिकेकडे असलेल्या आकड्यावर शंका उपस्थित केली जात आहे. महापालिकेच्या हिवताप व हत्तीपाय रोग विभागाकडे जानेवारी ते आतापर्यंत डेंग्यूचे फक्त ६० रुग्ण आढळून आले आहेत. परंतु याच्या चारपट रुग्ण सद्यस्थितीत उपचार घेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महापालिका डेंग्यूचे निदान करण्यासाठी संशयित रुग्णांची ‘इलिझा’ चाचणी करते. यात पॉझिटिव्ह आल्यावरच त्याची नोंद घेते. ही चाचणी मेयोच्या प्रयोगशाळेत व्हायची, परंतु मागील पाच दिवसांपासून येथील यंत्रात बिघाड झाल्याने रुग्णांचे नमुने डागा रुग्णालयात पाठविण्यात येत आहेत. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून हे नमुने येत असल्याने डागावर भार वाढला आहे. नमुन्यांचा अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. रुग्ण अडचणीत येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)दिवसाकाठी ८० वर नमुनेमेयो येथील ‘इलिझा रिडर’ बंद पडले आहे. त्यांनी आमच्याकडे या उपकरणाची मागणी केली होती परंतु ते शक्य नव्हते. परिणामी उपकरण दुरुस्त होईपर्यंत आम्हीच नमुन्यांची चाचणी करून देत आहोत. दिवसाकाठी ८० वर नमुने येत आहेत. मागील पाच दिवसांत सुमारे ३०० नमुन्यांची तपासणी केली असता ८८ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.-डॉ. आर.एच. फारुखीवैद्यकीय अधीक्षक, डागा रुग्णालय
पाच दिवसांत डेंग्यूचे ८८ रुग्ण
By admin | Published: September 14, 2014 1:10 AM