मुंबई – भारतातील व्हॅक्सिन किंग सायरस पूनावाला यांनी डेंग्यूबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढील १ वर्षात डेंग्यू (Dengue) वरील उपचार घेऊन येणार आहोत. आम्ही १ वर्षात डेंग्यूवर उपचार आणि लस घेऊन येणार आहे. या नवीन लसीची आफ्रिकन आणि भारत देशात अत्यंत आवश्यकता आहे. ज्याठिकाणी लाखो लोख या आजाराने संक्रमित होतात असं सायरस पूनावाला यांनी म्हटलं आहे.
कोविशील्डच्या यशानंतर जगात पहिल्यांदाच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मलेरिया, डेंग्यूवर लस विकसित करणार आहे. या लसीमुळे आफ्रिकन देश आणि भारताला मोठा दिलासा मिळेल. याठिकाणी लाखो लोकं दरवर्षी या आजाराने संक्रमित होतात. गेल्या अनेक वर्षापासून सीरम इन्स्टिट्यूट डेंग्यूच्या व्हॅक्सिनवर काम करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी सीरमने एक रिपोर्ट समोर आणला. ज्यात एका माणसाला डेंग्यूची लस देण्यात आली. ती सुरक्षित आणि चांगले परिणाम देणारी ठरली. डेंग्यूची लस तयार करण्यासाठी सातत्याने चाचणी करण्यात येत आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी डेंग्यूची जी लस वर्षभरात आणणार असल्याचे सांगितले, त्यात डेंग्यूच्या सर्व स्ट्रेनचा उपचार होणार आहे. सीरमकडून लवकरच ही व्हॅक्सिन बाजारात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये देशातील औषध प्रसारासाठी जलदगती मंजुरीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अर्ज करण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. सीरमने तिचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी यूएसमधील बायोटेक्नॉलॉजी कंपनी (व्हिस्टेरा) सोबत एकत्र येऊन काम केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, दरवर्षी १० ते ४० कोटी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळतात.
कसा होतो प्रसार?
डेंग्यू रोगाचा प्रसार डेंग्यू विषाणु दुषित एडिस एजिप्टाय प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. माणसाला हा डेंग्यू विषाणू दुषित डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसात डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यू तापाचे ३ प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात डेंग्यू ताप हा फल्यू सारखा आजार आहे. दुस-या प्रकारात रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप तर तिस-या प्रकारात डेंग्यू शॉक सिड्रोंम हा तीव्र प्रकारचा रोग आहे. यामध्ये मृत्यूही होण्याची शक्यता असते.