ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्याहत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या अरुण गवळींना हायकोर्टाने दणका दिला आहे. हायकोर्टाने अरुण गवळींवरील मोक्का हटवण्यास नकार दिला आहे.
मार्च २००८ मध्ये घाटकोपरमधील असल्फा येते शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मे २००८ मध्ये अरुण गवळींना अटक करण्यात आली आहे. साकीनाका येथील बांधकामांता दोघा व्यावसायिकांना सहकार्य करण्यास जामसंडेकर यांनी नकार दिला होता. या बांधकाम व्यावसायिकांनी गवळी टोळीकडे जामसंडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली होती. २०१२ मध्ये कोर्टाने गवळींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. कोर्टाने गवळींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्कांतर्गत शिक्षा सुनावली होती. मोक्का कायदा हटवावा अशी मागणी गवळींच्या वतीने हायकोर्टात करण्यात आली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे.